पिंपरी-चिंचवड

महत्त्वाची बातमी : हिंजवडी आयटी पार्क होणार उद्यापासून...

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी  :  कोरोनाच्या संकटामुळे गेले ४३ दिवस बंद असलेले हिंजवडी आयटी पार्क काही अटीशर्थींवर बुधवारपासून (ता. ६) पुन्हा सुरू होत आहे. प्रत्येक कंपनीने त्यांच्या मनुष्यबळाच्या 33 टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीत प्रवेश द्यावा व नियमांचे काटेकोर पालन करावे, या अटींवर जिल्हा प्रशासनाने त्यासाठी रितसर परवानगी दिल्याचे समजते. 

तीन झोनमध्ये विस्तारलेल्या सुमारे 130 कंपन्यांतून तब्बल चार लाख आयटी कर्मचाऱ्यांची आवक-जावक बंद झाल्याने राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानात गेले दीड महिना मोठा शुकशुकाट होता. हिंजवडी जरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगत असले, तरी याठिकाणी रेडझोन नसल्याने कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी काही कंपन्यांनी केली होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनच्या काळात बहुतांश आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्राम होम'ची सुविधा उपलब्ध करून दिल्याने बऱ्यापैकी कामकाज सुरू होते. त्यातील ७० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्राम होम शक्य होते. परंतु, अन्य कर्मचाऱ्यांना कंपनीत येणे आवश्यक होते. आता पुन्हा कपंन्या सुरू होत असल्याने ते शक्य होऊन नियमित कामकाज रुळावर येईल, असे हिंजवडीचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते म्हणाले, "अटीशर्थींवर कंपन्या सुरू करण्याचा आदेश पोलिसांना प्राप्त झाला आहे. कंपन्या सुरू करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळणे बंधनकारक आहे. प्रत्येक कर्मचारी किमान पाच फूट अंतरावर असेल. त्याशिवाय सॅनिटायझेशन, बस सुविधा आदी, अटी पाळणे गरजेचे आहे. त्याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाकडे सोपविण्यात आली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT