पिंपरी-चिंचवड

पावसाळ्यात आढळणारा 'हा' नाकतोडा तुम्ही पाहिलाय का?

संतोष थिटे

बेबडओहोळ (ता. मावळ) : हुडेड ग्रासहॉपर हा दुर्मिळ नाकतोडा मावळ तालुक्यातील ऊर्से गावाजवळील डोंगराळ भागात आढळून आला. हुडेड ग्रासहॉपर हा नाकतोड्या जातीतील सुपर फॅमिलीतील असून, तो दुर्मीळच आहे. त्यामुळे तोही कमी प्रमाणात आढळतो. मात्र, क्वचितच आढळणारा व दृष्टीस पडणारा हुडेड हा नाकतोडा पावसाळ्यात दिसतो.

भारत व श्रीलंका येथे सापडणारा हा नाकतोडा खूप कमी प्रमाणात आढळतो. इंग्लिश प्राणिशास्रज्ञ जॉर्ज रॉबर्ट ग्रे यांनी १८३२ सालात पहिल्यादा शोधून काढला आणि ग्रालाईस मोन्टीकोलाईस, असे त्याचे नामकरण केले. पुन्हा फ्रेंच कीटकशास्रज्ञ गॅस्पेर्ड अँगुस्टे ब्रुल्ले यांनी १८३५ सालात या नाकतोड्याला तेराटुडेस मोन्टीकोलाईस हे नवीन नाव दिलं. तरी देखील तो त्याच्या भरगच्च आवरणामुळे हुडेड ग्रासहॉपर हे त्याच्या टोपन नावामुळेच जास्त ओळखला जातो. हा नाकतोडा ऑर्थोप्टेरा या गटामध्ये मोडतो. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झाडांच्या पानांवर गुजराण करतो. परंतु, कधी-कधी साग आणि चंदन झाडाच्या पानांवर कीड म्हणून गुजराण करतो. मात्र, त्याची संख्या खूप कमी असते. शिवाय रंगही खूप आकर्षक असतो. हुडेड नाकतोड्याचा रंग हिरवा गर्द असतो आणि त्याचा शरीराचा प्रोनोटम भाग हूडसारखा वाढलेला असतो. हुडच्या बॉर्डरवर पिवळ्या रंगाची स्ट्रीप असते म्हणून हा कीडा एकदम आकर्षक दिसतो. दरम्यान, हा नाकतोडा मावळ तालुक्यातील ऊर्से गावाजवळील डोंगराळ भागात नुकताच पहायला मिळाला. अतिशय वेगळा व आकर्षक दिसणारा हा नाकतोडा पहायला मिळणे दुर्मिळ आहे.

हुडेड हा टोपणनाव असणारा नाकतोडा क्वचितच आपल्या भागात आढळतो. त्यामुळे त्यांची संख्या खुपच कमी आहे.
- हेमंतकुमार डुंबरे,सहाय्यक प्राध्यापक, कृषी कीटकशास्र विभाग, तळेगाव दाभाडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT