Illegal hoarding Jadhavwadi chikhali sakal
पिंपरी-चिंचवड

Illegal Hoarding : पिंपरी-चिंचवड शहरातील नियमबाह्य होर्डिंग्ज ठरताहेत ‘काळ’

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १४ जणांचा बळी गेला आणि गेल्या वर्षी किवळेत घडलेल्या घटनेच्या कटू आठवणी जाग्या झाल्या.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १४ जणांचा बळी गेला आणि गेल्या वर्षी किवळेत घडलेल्या घटनेच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. नियमबाह्य पद्धतीने उभारलेले होर्डिंग्ज जीवघेणे ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड

शहरातही मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज उभे आहेत. त्यांचा आकार, उंची, ठिकाणे याबाबतचे सर्व नियम पायदळी तुळवले गेले आहेत. सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने व पावसाळाही तोंडावर असल्याने आणखी बळी जाण्याची वाट प्रशासन पाहतेय का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गालगत (मुंबई-बंगळूर महामार्ग) किवळे येथील होर्डिंग गेल्या वर्षी १७ एप्रिल रोजी वादळी पावसामुळे कोसळले होते. त्याखाली थांबलेल्या पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक होर्डिंग्जची शोधमोहीम सुरू केली. १९१ होर्डिंग्ज काढून टाकले. होर्डिंग्जच्या ढाच्यांचे स्ट्रक्चरल ऑडीटही केले होते. मात्र, शहरातील प्रत्येक रस्त्यावर अद्यापही धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज दिसत आहेत.

जाधववाडीत पुन्हा उभारले होर्डिंग

महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्जवर गेल्या वर्षी कारवाई केली होती. त्यात जाधववाडीतील राजा शिवछत्रपती चौकालगतच्या होर्डींग्जचाही समावेश होतो. त्याच्या सांगड्याचा एक खांब प्राधिकरणाच्या जागेत व दुसरा खांब महापालिकेच्या जागेत पदपथावर होता. ते होर्डिंग्ज एका माजी महापौराने उभारून भाडेही तेच घेत होते.

त्यावर कारवाई करणाऱ्या पथकाला दमदाटीही केली होती. पोलिस बंदोबस्तात होर्डिंग काढले होते. आता त्या जागेवर अर्थात पदपथावर पुन्हा होर्डिंग उभे असून, दोन खांबांऐवजी ते एकाच खांबावर असल्याने धोकादायक आहे.

घाटकोपर घटनेनंतर प्रशासनाला जाग

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १४ जणांना बळी केल्यानंतर राज्य सरकारसह जिल्हा व महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अवैध व धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करण्याचा आदेश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रभाग संचालक लहू माळी यांनी दिला आहे.

त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी महापालिकेला आदेश देऊन धोकादायक होर्डिंग्जबाबत कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुधवारपासून (ता. १५) शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सूचना

  • शहरातील व महामार्गावर लावलेल्या होर्डिंग्जची रचनात्मक तपासणी करावी

  • तपासणीत आढळलेले अनधिकृत होर्डिंग्ज काढून संबंधितांवर कारवाई करावी

  • दुर्घटना टाळण्यासाठी होर्डिंग्जच्या परिसरात न थांबण्याच्या नागरिकांना सूचना द्यावी

  • सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा दाखला १५ दिवसांत सादर करावा

  • स्ट्रक्चरल ऑडिटने केलेले होर्डिंग्ज अनधिकृत समजून काढून टाकावेत

अशी आहेत होर्डिंग्ज...

  • मुंबई-पुणे महामार्गावर निगडी-दापोडी दरम्यान ३५ मोठमोठे होर्डिंग्ज

  • सरकारी जागेवर खासगी व्यक्तींनी अनधिकृतपणे उभारलेले

  • विनापरवाना घरांचे छत, पदपथ, बागेत, चौकांत, इमारतींच्या संरक्षक भिंतींवर

  • होर्डिंग्ज उभारणीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आपापल्या सोयीनुसार

  • परवाना एक, होर्डिंग्ज अनेक; परवान्यावर नमूद आणि प्रत्यक्षातील आकारात फरक

११३६ - शहरातील अधिकृत होर्डिंग्ज

१९१ - गेल्या वर्षी कारवाई केलेले

४००० - सुमारे अनधिकृत होर्डिंग्ज

पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी होडिंग्ज पडून नागरिकांचे बळी जातात. पण प्रशासन त्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केल्यासारखे दाखविते. पण ठोस काही पावले उचलत नाही. तुम्हालाही तुमच्या भागात असे होडिंग्ज असतील तर आम्हाला कळवा. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा pimpritoday@esakal.com या मेलवर, तसेच ७७२१९७४४४७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

चिंचवड येथील हुतात्मा क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या आवारातही एकाच खांबावर उंच होडिंग्ज उभारले आहे. रस्त्याच्या कडेला हे ठिकाण असून स्मारकाच्या आवारात ग्रंथालय असून अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. स्मारकाला अनेक नागरिक भेट देत असतात. शिवाय, त्यालगत मॉल व पीएमपीचे बसस्थानक आहे. त्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. होर्डिंग अनधिकृत असून ते कोसळण्यास जीवितहानी होऊ शकते. त्यावर कारवाई करावी.

- राजाभाऊ गोलांडे, अध्यक्ष, गांधीपेठ तालीम मित्रमंडळ, चिंचवड

गेल्या वर्षी १९१ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली होती. बुधवारपासून परवाना निरीक्षकांच्या आठ पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे. परवाना आहे की नाही, उंची किती आहे, आकार किती आहे, जागा कोणाची आहे यानुसार सर्वेक्षण शुक्रवारपर्यंत करून सोमवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज काढले जाणार आहे. गेल्या वर्षी न्यायालयात गेलेले होर्डिंग्ज धारकांना शुल्क भरून अनधिकृत करून घेण्याची व स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची कार्यवाही सुरू आहे.

- संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT