International War Risk & Trump Impeachment : २३ ऑगस्टच्या अमांत कुंडलीत गुरू भाग्यस्थानी असल्यामुळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडेल. लग्नस्थानावर गुरूची दृष्टी असल्यामुळे जनता आनंदी, समाधानी राहील. तसेच राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल पुढील काळात संभवतात. प्रमुख पदांवरील व्यक्ती राजीनामे देतील. राज्य व केंद्रातील मंत्रिमंडळांमध्ये महत्त्वाचे फेरबदल होतील, असं भाकीत ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलं आहे.