Ganesh Chaturthi 2025 Puja: गणपती पूजेत लागणाऱ्या साहित्याची आजच करा यादी, आयत्यावेळी होणार नाही गडबड

Ganpati Puja material list for Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवादरम्यान गणपती पूजेसाठी सकाळ- संध्याकाळ आरतीसाठी कोणत्या साहित्याची गरज असते हे एका क्लिकवर वाचुया.
Ganpati Puja material list for Ganesh Chaturthi 2025:
Ganpati Puja material list for Ganesh Chaturthi 2025: Sakal
Updated on
Summary

गणेश चतुर्थी 2025 साठी गणपती पूजेसाठी आवश्यक साहित्याची यादी तयार करा. यामुळे आयत्यावेळी गोंधळ होणार नाही. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी घरोघरी सुरू आहे. बाजारपेठ सजली असून आकर्षक मूर्ती उपलब्ध आहेत. पूजेच्या साहित्याची यादी तयार करून खरेदी करा, त्यामुळे वस्तू डबल होणार नाहीत आणि गडबड टाळता येईल.

Ganpati Puja material list for Ganesh Chaturthi 2025: महाराष्ट्रात पुणे, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला जातो. यंदा 27 ऑगस्टला गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यामुळे लाडक्या बाप्पांच्या आगमनाची आतुरता सर्वांना लागली आहे.

बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी केली जात आहे. बाजारपेठही सजली आहे. वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक मूर्ती बाजारात पाहायला मिळत आहेत. दहा दिवस चालणारा गणपती उत्सव देशभरात जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी काळात प्रत्येक घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आणि मनोभावे पूजा केली जाते.

कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणपती बाप्पांची पूजा करून केली जाते. मान्यतेनुसार असे केल्यास कामामध्ये यश मिळते. गणेशोत्सवात विघ्नहर्ताची मनोभावे पूजा केल्यास अनेक संकटांमधून सुटका होते.

गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पांची सकाळ- संध्याकाळ पूजा केली जाते. अशावेळी आयत्यावेळी गोंधळ आणि गडबड होऊ नये म्हणून आरतीसाठी कोणत्या साहित्याची गरज असते हे जाणून घेऊया.

गणपती पूजेत लागणाऱ्या साहित्याची यादी

  • चौरंग आणि पाट

  • बसण्यासाठी आसनं

  • ताम्हण

  • तांब्या

  • पळी आणि पंचपात्र

  • शंख

  • घंटा

  • अगरबत्तीचं घर

  • निरांजन

  • समई

  • फुलवाती आणि समईच्या वाती

  • निरांजन

  • समईत घालायला तूप /तेल

  • धूप आणि अगरबत्ती

  • काडेपेटी

  • हळद-कुंकु

  • अष्टगंध

  • शेंदूर

  • अक्षता

  • रांगोळी

  • अत्तर

  • भिमसेन कापूर

  • सुपाऱ्या

  • खारीक

  • अक्रोड

  • हळकुंड

  • बदाम

  • कापसाची माळवस्त्र

  • जानवी जोड

  • सुक्या खोबऱ्याची वाटी आणि गूळाचा खडा नैवेद्यासाठी

  • नारळ

  • विड्याची पानं

  • बाप्पाच्या अभिषेकासाठी पंचाळ्यात किंवा ५ वाट्यांमध्ये वेगवेगळे काढून ठेवलेलं दुध, दही, तूप, साखर आणि मध

  • फळं – ५ प्रकारची

  • मिक्स फुल

  • दुर्वा

  • शमीपत्र

  • बेल

  • आंब्याची डहाळी

  • बाप्पासाठी फुलांचा हार /कंठी

  • नैवेद्यासाठी खिरापत /मोदक / पंचखाद्य / खडीसाखर

  • सुट्टे पैसे

Ganpati Puja material list for Ganesh Chaturthi 2025:
Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पा मोरय्या! यंदा 26 की 27 ऑगस्ट कधी आहे गणेश चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहुर्त

वर दिलेले साहित्य घरात किती प्रमाणात आहे हे चेक करावे आणि नंतरच खरेदी करायाला जावे. यामुळे वस्तु डबल होणार नाही. तसेच या यादीतील कोणतेही साहित्य खराब होणार नाही. बाजारात जाण्यापुर्वी साहित्याची यादी सोबत ठेवावी. आजकाल अनेक लोक फोनमध्येच यादी करतात. पण गर्दीच्या ठिकाणी फोन चोरीला जाण्याची भिती असते. यामुळे बाजारात जाताना यादी कागदावर तयार करावी.

Q

गणपती पूजेसाठी कोणत्या साहित्याची आवश्यकता असते?

A

उत्तर: गणपती मूर्ती, फुले, दूर्वा, मोदक, हळद, कुंकू, चंदन, अगरबत्ती, दिवे आणि प्रसाद यांचा समावेश होतो.

Q

गणपती पूजेची यादी कशी तयार करावी?

A

उत्तर: पूजेच्या विधींनुसार आवश्यक साहित्याची नोंद करून, उपलब्धता तपासून आणि बाजारातून खरेदी करावी.


Q

आयत्यावेळी गडबड कशी टाळावी?

A

उत्तर: पूजेच्या २-३ दिवस आधी यादी तयार करून साहित्य खरेदी करावे आणि व्यवस्था तपासावी.

Q

गणपती पूजेसाठी प्रसादात काय समाविष्ट करावे?

A

उत्तर: मोदक, लाडू, खीर किंवा फळे यांसारखा गोड पदार्थ प्रसाद म्हणून ठेवावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com