पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या परिस्थितीचा नड्डा यांनी 'व्हिसी'द्वारे घेतला आढावा

रमेश मोरे

जुनी सांगवी : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांच्याबरोबर गुरूवारी रात्री आठच्या सुमारास संपर्क साधून पिंपरी चिंचवड शहरातील लॉकडाऊन व एकूण परिस्थितीबाबत चर्चा केली. शहरातील कोरोना संदर्भात रुग्णांची संख्या, एकूण होम क्वारंटाईनची व्यवस्था कशी आहे, याबाबत त्यांनी चर्चा केली.

नड्डा यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान योग्य नियोजन व व्यवस्था होते का? महापालिकेकडून केलेल्या कोरोनाच्या उपचारासाठी स्वतंत्र हॉस्पिटल व नागरिकांनासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात. तसेच भाजपचे कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून नागरिकांना केली जात असलेली सेवाकार्य जेवणाची व्यवस्था व शिधा योग्य व्यवस्थापनाद्वारे यशस्विरित्या राबवली जात आहे का? याची राष्ट्रीय अध्यक्षांकडून ईत्यंभूत  माहिती घेण्यात आली. याचबरोबर स्थलांतरित नागरिक, परराज्यातील नागरिक अशा घरी जाणाऱ्या नागरिकांचे काय, त्यांची घरवापसी करण्यासाठी योग्य ती व्यवस्था कार्यवाहीचे काय केले, व्यवस्था कशी आहे? सर्व नागरिकांना स्वस्तधान्य दुकानातून धान्य योग्यप्रकारे वाटप चालू आहे का? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. शहराची आठवण करून देत औद्योगिक क्षेत्र चालू करण्यात आले का ते कशाप्रकारे पूर्वपदावर आणता येईल. रोजगाराची साधने उपलब्ध करून कष्टकरी सर्वसामान्यांना पुन्हा पूर्वपदावर कसे आणता येईल? या विषयावर चर्चा करण्यात आल्याचे व महापौरांकडून सद्यस्थितीत सुरू असलेल्या सेवाकार्य व उपक्रमांची माहिती देण्यात आल्याचे उषा ढोरे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापौर ढोरे म्हणाल्या, भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या सूचनांचे योग्य ती कार्यवाही पिंपरी-चिंचवड शहरात सुरू आहे. यात नागरिकांनी दिलेला संयमी प्रतिसादही खूप मोठा आहे. सरकारच्या ध्येयधोरणानुसार पुढील काळात सर्व सूचना व नियमांचे पालन करून शहरातील लघुउद्योग व इतर गोष्टी सुरू करण्याबाबत चर्चा करून समतोल साधून निर्णय घेण्यात येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT