Kirtan Mahotsav sakal
पिंपरी-चिंचवड

Kirtan Mahotsav : ‘सकाळ’तर्फे सोमवारपासून ‘नाचू कीर्तनाचे रंगी’

आषाढी वारी व आषाढी एकादशीनिमित्त सोमवारपासून (ता. २६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात चार दिवस आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कीर्तन महोत्सवाचे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - देहू व आळंदी येथून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालखी सोहळ्यांत सहभागी होऊ न शकलेल्या व आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांना हरिनामाचा महिमा अर्थात कीर्तन श्रवणाचा लाभ ‘सकाळ माध्यम समूहा’ने शहरातच उपलब्ध करून दिला आहे.

निमित्त आहे, आषाढी वारी व आषाढी एकादशीनिमित्त सोमवारपासून (ता. २६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात चार दिवस आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कीर्तन महोत्सवाचे.

आषाढी पायी वारीसाठी देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. बुधवारी (ता. २८) सोहळे पंढरपूरमध्ये पोचणार आहेत. त्यात सहभागी वारकरी भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरणात तल्लीन झाले आहेत. मात्र, जे भाविक काही कारणास्तव पंढरपूरला किंवा वारीला जाऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी ‘सकाळ’ने ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे.

कीर्तनांची वेळ व कीर्तनकार

  • सोमवार, ता. २६ - दुपारी ४.३० - रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, नागपूर

  • मंगळवार, ता. २७ - दुपारी ४.३० - जगन्नाथ महाराज पाटील, मुंबई

  • बुधवार, ता. २८ - दुपारी ४. ३० - पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी

  • गुरुवार, ता. २९ - सकाळी ९ - यशोधन महाराज साखरे, आळंदी

सकाळ विभागीय कार्यालय

  • ‘बी-झोन’ बिल्डिंग, ५ मजला, ऑफीस नं. ५०७ ते ५१०, जुना पुणे-मुंबई महामार्ग, एम्पायर इस्टेटजवळ, पिंपळे पेट्रोलपंपाशेजारी, पिंपरी.

  • प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड संपर्क : ७६२०८८७३१७

  • दिनेश अॅडस् : बिग इंडिया चौक, सेक्टर २५, निगडी प्राधिकरण - ८९७५७६१८६३

  • गुरुकृपा बुकस्टॉल : अंकुश लांडगे मिनी मार्केट, आळंदीरोड चौक, भोसरी एसटी स्टँड जवळ - ९८५००३९७११

काय? कुठे? कधी? केव्हा? कसे?

  • काय? - ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव

  • कुठे? - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

  • कधी? - २६ ते २९ जून

  • केव्हा? - सोमवार ते बुधवार दुपारी ४.३०; गुरुवार सकाळी ९

  • कसे? - प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक

(टीप - प्रवेशिका सोमवारपासून उपलब्ध)

प्रवेशिकांसाठी संपर्क

  • रोशन : ९५४५९८११५९

  • प्रशांत : ८३८००७४८२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT