पिंपरी : दीड महिन्यापासून सुरू असणाऱ्या लॉकडाउनमुळे घरी बसून असणाऱ्या कामगारांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. उद्योगनगरीमधील कंपन्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी ग्रामीण भागात कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्याठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यामुळे शहरातील कामगारांनी त्याठिकाणी कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात उद्योगनगरीतील कंपन्या सुरू झाल्या, तर त्यांना मनुष्यबळाचा तुटवडा भासणार आहे.
मिळतोय उद्योगनगरीपेक्षा जास्त रोज...
उद्योगनगरीमध्ये हेल्परला दिवसाला 450 रुपये रोजदांरी मिळते. चाकण, तळेगाव, शिक्रापूर, रांजणगाव या परिसरातील कंपन्यांमध्ये या कर्मचाऱ्यांना दिवसाला 500 रुपयांची रक्कम मिळत आहे. याखेरीज काहीजणांनी राहण्यासाठी आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाउनच्या काळात दिवसाला मिळणारी रोजदारींची रक्कम 50 रुपयांनी जास्त मिळत असल्यामुळे हे कर्मचारी खूश आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
उद्योगनगरीत भासणार मनुष्यबळाची भासणार...
उद्योगनगरीमधील कंपन्या सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली, तर इथल्या कंपन्यांना मनुष्यबळाची कमतरता जाणवणार आहे. कारण म्हणजे कोरोनाला सुरुवात होण्याअगोदरच इथे काम करणारे अनेक कामगार आपल्या गावी निघून गेले आहेत. राज्याच्या अनेक भागातील लोक याठिकाणी काम करत आहेत. त्यांनादेखील गावी जाता यावे, म्हणून राज्य सरकारने एसटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे यामध्ये आणखीन भर पडणार आहे. याखेरीज उद्योगनगरी कंपन्या सुरू करत असताना त्याठिकाणी कंटेन्मेंट झोनमधे राहाणारे कर्मचारी, पुण्यात राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. याशिवाय उपलब्ध असणाऱ्या कामगारांकडून नियमित तासांच्यावर जादा काम करून घ्यायचे नाही, अशी सूचना उद्योग विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांना आहे, त्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्पादन सुरू करावे लागणार आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तीन हजार कोटींचा फटका बसणार...
उद्योगनगरीमधील कारखाने सुरू झाले, तरी त्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होणार नसल्यामुळे त्याचा थेट परिणाम उत्पादन निर्मितीवर होणार आहे. उद्योगनगरीची महिन्याची उत्पादन निर्मितीची उलाढाल 15 हजार कोटी पर्यंतची आहे. पुरेसे आणि कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे दर महिन्याला तीन हजार कोटीपर्यंत फटका बसण्याची शक्यता आहे. उद्योगनगरीमध्ये सुमारे 14 हजारापर्यंत कंपन्या असून, त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या चार लाख 50 हजारापर्यंत आहे. त्यापैकी परराज्य आणि राज्याच्या अन्य शहरातील कर्मचाऱ्यांची संख्या सव्वा लाखापर्यंत असून, हे सर्वजण आपल्या गावी गेले आहेत.
उद्योगनगरीमधील कंपन्या सुरू झाल्या, तरी त्यांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासणार आहे. त्याचा परिणाम उत्पादन निर्मितीवर होणार आहे. उद्योगनगरीतील स्थिती स्थिरसावर होण्यासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.