shivdurg rescue team sakal
पिंपरी-चिंचवड

Lonavala News : बेपत्ता व्यक्तीचा दोन हजार फूट खोल दरीत आढळला मृतदेह

लोणावळा येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लायन्स पॉईंट येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यास 'शिवदुर्ग रेस्क्यू टीम'ला चार दिवसानंतर आले यश.

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा - येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लायन्स पॉईंट येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यास शिवदुर्ग रेस्क्यू टीमला चार दिवसानंतर यश आले आहे.

संतोष शिळवणे (रा. रामनगर,लोणावळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी (ता.२८) रोजी लायन्स पॉईंट येथील सुमारे दोन हजार फूट खोल दरीत शिळवणे यांचा मृतदेहाचे अवशेष पथकास मिळून आले.

मिळालेल्या माहतीनुसार, सोमवारी (ता.२५) लायन्स पॉईंट येथून एक व्यक्ती बेपत्ता झाली असल्याची माहिती मिळाली होती. सदर व्यक्ती दरीत पडली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. येथील शिवदुर्गच्या बचाव पथकास घटनेची माहिती मिळताच सोमवारपासूनच शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

मात्र दाट धुके आणि पाऊस यामुळे शोध कार्यात अडचण येत होती. दरम्यान खोल दरीत बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना बुधवारी दरीत उतरलेल्या बचाव पथकास कपडे आणि मृतदेहाचे काही अवयव मिळून आले होते. गुरुवारी (ता.२८) सकाळी शिवदुर्गने सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केली.

अखेर चार दिवसांनंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मृतदेह शोधण्यास बचाव पथकाला यश आले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर मृतदेह खोल दरीत वाहून आल्याने छिन्नविछिन्न झाला होता. मोठ्या प्रयासाने मृतदेह दरीतून वर काढण्यास यश आले. याबत अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड, सचिन गायकवाड, योगेश उंबरे, योगेश दळवी, ओंकार पडवळ, सनी कडु, गणेश गायकवाड, अशोक उंबरे, राजेंद्र कडु, महेश मसने, आनंद गावडे, दुर्वेश साठे, आदित्य पिलाने, आयुष वर्तक, यश सोनवने, दिव्येश मुनी, सागर कुंभार, रोहित फुनसे, हर्ष तोंडे, हर्षल चौधरी, प्रविण ढोकळे, कपिल दळवी, मयुर दळवी, सुनिल क्षीरसठ, ऋषीकेश येवले, नितेश कुटे आदींच्या पथकाने ही शोध मोहीम राबवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT