
शुभमन गिलने दुलीप ट्रॉफीतून माघार घेतली असून फिजिओच्या सल्ल्यानुसार तो खेळणार नाही.
ब्लड टेस्टनंतर बीसीसीआयला अहवाल पाठवण्यात आला असून त्यात धोकादायक काही नाही.
आशिया कप २०२५ साठी गिलला भारतीय संघाचा उपकर्णधार नेमले गेले आहे.
Will Shubman Gill miss Asia Cup 2025 due to injury? आशिया चषक २०२५ स्पर्धा तोंडावर असताना शुभमन गिलबाबत चिंता व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. आशिया चषक स्पर्धेपूर्वी प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफी सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल हा उत्तर विभाग संघाचे नेतृत्व करणार होता. पण, हाती आलेल्या बातमीनुसार त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.