Maharashtra Politics shiv sena and uddhav thackeray we will always with them till last breath shiv sainik  wakad
Maharashtra Politics shiv sena and uddhav thackeray we will always with them till last breath shiv sainik wakad sakal
पिंपरी-चिंचवड

प्राणात प्राण असेपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार - शिवसैनिक

सकाळ वृत्तसेवा

वाकड : सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेनेत फुट पडल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २५) सायंकाळी चिंचवडगाव चापेकर चौकातील क्रांतिवीर चापेकर स्मारकासमोर शिवसैनिकांनी बंडखोरांचा निषेध केला. प्राणात प्राण असेपर्यंत शिवसेने सोबत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहू अशी सामुहिक शपथ शिव सैनिकांनी घेतली.यावेळी जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर संघटक संतोष सौंदणकर, चिंचवड शहरप्रमुख अनंता कोरहाळे, उपविभाग प्रमुख कुदरत खान, युवा सेना अधिकारी माऊली जगताप, वेताळ नगर शाखा प्रमुख माजिद शेख, विभाग संघटक राजेश अरसुळ यांच्यासह मोठ्या संख्यने शिवसैनिक उपस्थित होते. जय भवानी जय शिवाजी!, गद्दारांचे करायचे काय?

खाली मुंडके वर पाय! क्षमा नाही क्षमा नाही, गद्दारांना क्षमा नाही! महाराष्ट्र का नेता कैसा हो, उद्धव साहेब जैसा हो! अशा घोषणा देण्यात आल्या. तत्पूर्वी सेनेचे काही पदाधिकारी या निषेध कार्यक्रमाची परवानगी मागण्यासाठी चिंचवड पोलिसांकडे गेले होते मात्र सध्याचे तापलेले राजकारण आणि या प्रकरणाला वेगळे वळण लागू नये म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही शांततेत निषेध करू आणि सामूहिक शपथ घेवू असे आश्वासन देत शिवसैनिकांनी हे निषेध आंदोलन केले. संतोष सौंदनकर यांनी शिवसैनिकांना शपथ दिली. चिंचवड वेताळ नगर आणि मोरया नगर शाखेने आयोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला; धरणात जलसमाधीसाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

SCROLL FOR NEXT