mahesh-landge-laxman-jagtap Sakal
पिंपरी-चिंचवड

लांडगे-जगताप यांच्या चुकीच्या कामांचा फटका भाजपला बसणार

‘पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये महेश लांडगे व लक्ष्मण जगताप या दोन आमदारांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांचा फटका पक्षाला येत्या निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे’, असे पत्र नगरसेवक तुषार कामठे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवून घरचा अहेर दिला आहे. सोमवारी सायंकाळी सोशल मिडियावर व्हायरल झालेले पत्र चर्चेचा विषय झाला आहे.

पत्रात म्हटले आहे की, दोन्ही आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व मतदार भाजप नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित आहे. लांडगे व जगताप यांनी शहरात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगरसेवकांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत तिकीट वाटपावेळी लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय घेवू नये. त्याऐवजी भाजपच्या मेहनती सर्वसामान्य सच्चा कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी.

ज्या आमदारांनी चुकीची कामे केली आहेत, ते कदाचित स्वतःची कातडी वाचविण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात. तशी शक्यताही सध्या वर्तवली जात आहे. पण माझ्यासारखा भाजपच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही. हे दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील. परंतु नवीन कार्यकर्ता केव्हाही पक्ष बदलू शकत नाही, असेही पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT