Pawana Dam sakal
पिंपरी-चिंचवड

Maval Dam Water : मावळातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ; पवनामध्ये ३३.२६ टक्के पाणीसाठा

मावळ तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस झाल्याने तालुक्यातील पवनेसह महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस झाल्याने तालुक्यातील पवनेसह महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पवना धरणात ८.५ टक्के इतकी वाढ झाली असून पाणीसाठा ३३.२६ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. या धरण परिसरात रविवारी (ता.१४) ८१ मिलिमीटर तर १ जूनपासून आत्तापर्यंत ७४३ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

यंदा मान्सून लांबल्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. पावसाळ्याचा दीड महिना संपला तरी दमदार पाऊस झाला नव्हता. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत मात्र दमदार पाऊस झाला. नद्या, नाले, दुथडी भरून वाहू लागले आहेत. भात खाचरे तुडुंब भरली. तालुक्यातील धरणांतील आवक वाढल्यामुळे पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होऊ लागली आहे.

वडिवळे धरणात ७२.७२ टक्के पाणीसाठा

नाणे मावळातील वडिवळे धरणात सध्या ७२.७२ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती शाखाधिकारी संतोष शिंदे यांनी दिली. महिन्याभरापूर्वी धरणात ४२ टक्के; तर १३ जुलै रोजी ५५ टक्के पाणीसाठा होता. दमदार पावसामुळे दोन दिवसांत पाणीसाठ्यात १७.७७ टक्के वाढ झाली आहे. धरण परिसरात रविवारी १०५ मिलीमीटर तर आत्तापर्यंत एकूण ९०४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

आंद्रा धरणात ३३.५७ टक्के पाणीसाठा

आंदर मावळातील आंद्रा धरणात सध्या ३३.५७ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती शाखाधिकारी माणिक शिंदे यांनी दिली. महिन्याभरापूर्वी धरणात २५ टक्के तर १३ जुलै रोजी २६ टक्के पाणीसाठा होता. दमदार पावसामुळे दोन दिवसांत पाणीसाठ्यात ७.५७ टक्के वाढ झाली आहे. धरण परिसरात रविवारी ४९ मिलीमीटर पाऊस झाला; तर आत्तापर्यंत एकूण ३४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जाधववाडी धरणात ४२.६७ टक्के साठा

पूर्व भागातील जाधववाडी धरणात सध्या ४२.६७ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती जाधववाडी धरणाचे शाखाधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. महिन्याभरापूर्वी धरणात ३०.८५ टक्के तर १३ जुलै रोजी ३०.४३ टक्के पाणीसाठा होता. दमदार पावसामुळे दोन दिवसांत पाणीसाठ्यात १२.२४ टक्के वाढ झाली आहे.

मावळ तालुक्यातील आंद्रा, वडिवळे व जाधववाडी धरण लाभक्षेत्रात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसाचा परिणाम म्हणून इंद्रायणी नदीवरील देहू ते तुळापूर येथील सर्व कोल्हापुरी बंधाऱ्यांमधील पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तरी नागरिकांनी कोल्हापुरी बंधाऱ्यावर जलपर्यटन अथवा वाहतुकीसाठी जाऊ नये.

- किशोर चव्हाण, सहायक अभियंता श्रेणी-२, पाटबंधारे शाखा, मोशी

पवना धरणात ८.५ टक्के वाढ

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या ३३.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. महिन्याभरापूर्वी धरणात २० टक्के तर १३ जुलै रोजी २४.८३ टक्के इतका पाणीसाठा होता. दमदार पावसामुळे दोन दिवसांत पाणीसाठ्यात ८.५ टक्के एवढी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT