ajit pawar anna bansode sakal
पिंपरी-चिंचवड

Maharashtra Politics : आमदार बनसोडे यांनी मंत्रीपद मिळण्यासाठी अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांची भेट

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची पहाटे शपथ घेतली तेव्हा आमदार बनसोडे हे एकमेव आमदार त्यांच्या सोबत शेवटपर्यंत होते.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रीमंडळाच्या विस्तारात संधी द्यावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. ११) अजित पवार यांना मुंबईत जाऊन भेटले.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची पहाटे शपथ घेतली तेव्हा आमदार बनसोडे हे एकमेव आमदार त्यांच्या सोबत शेवटपर्यंत होते. आत्ताही अजित पवार यांनी बंड करुन शपथ घेतली तेव्हा आमदार बनसोडे त्यांच्या पाठीशीच राहिले आहेत.

राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना मानणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर-जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीस माजी नगरसेवक, सर्व विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत आमदार बनसोडे यांना शहरातून राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी, असा ठराव करण्यात आला. त्यानुसार आम्ही आमदार बनसोडे यांना संधी द्यावी, अशी मागणी करत आहोत, असे गव्हाणे व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळात अजित गव्हाणे, माजी नगरसेवक शाम लांडे, राहुल भोसले, पंकज भालेकर, मयूर कलाटे, निलेश डोके, विजय लोखंडे, धनंजय भालेकर, संजय औसरमल, विनय शिंदे, सागर कसबे आदिंचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT