gang attack on youth Sakal
पिंपरी-चिंचवड

रहाटणीत टोळक्याचा तरुणावर हल्ला

वडिलांच्याच सांगण्यावरून हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोयता घेऊन अंगावर धावून जात टोळक्याने हत्यारे व दांडक्याने तरुणावर हल्ला केला. हा प्रकार थेरगावजवळील रहाटणी फाटा येथे घडला. टोळक्याने हा हल्ला वडिलांच्याच सांगण्यावरून केल्याचे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे.

किरण महेश साळवी (रा. किनारा कॉलनी, रहाटणी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश साळवी (रा. किनारा कॉलनी, रहाटणी), आकाश अशोक रंधवे, वैभव महादेव अवसर , एक अल्पवयीन मुलगा व दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्याच्या वडिलांचा रहाटणी फाटा येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.

फिर्यादीला त्यांच्या वडिलांबद्दल एक माहिती मिळाल्याने फिर्यादी हे त्यांच्या आईसह बुधवारी (ता. १३) दुपारी साडे तीनच्या सुमारास विचारणा करण्यासाठी वडिलांकडे गेले. तेथे वडिलांनी फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने एकजण कोयता घेऊन फिर्यादीवर धावून आला. त्याला फिर्यादीच्या कामगारांनी पकडले. मात्र, तो हात झिडकारून पसार झाला. दरम्यान, दुसऱ्या एकाला फिर्यादीने पकडून ठेवले. काही वेळाने पसार झालेला आरोपीं तीन ते चार साथीदारांना घेऊन आला. त्यांच्याकडील दांडके व हत्याराने फिर्यादीला मारहाण करून ते पसार झाले.

दरम्यान, फिर्यादीने पकडलेल्या आरोपीला घेऊन पोलिस ठाण्यात नेत असताना आकाश रंधवे याचा आरोपीच्या मोबाईलवर फोन आला. तो फोन फिर्यादीकडे दिल्यानंतर आकाशने फिर्यादीला मारण्याची धमकी दिली. दरम्यान, हा हल्ला आरोपींनी वडिलांच्या सांगण्यावरून केल्याचे किरण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT