पिंपरी-चिंचवड

आईची दोन मुलांसह विहिरीत उडी, एकाचा मृत्यू; चिखलीतील घटना

सकाळ वृत्तसेवा

चिखली : येथील सोनवणे वस्ती परिसरात सोमवारी (ता. 18) दुपारी चारच्या सुमारास अठ्ठावीस वर्षीय महिलेने आपल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार जवळच्या शेतात काम करणाऱ्या मजूरांच्या लक्षात येताच त्यांनी विहिरीत उडी घेऊन महिला व तिच्या एका मुलाला वाचविले. तर दुसऱ्या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रूपाली गणेश गाढवे (वय 28) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.  तिने आपल्या गौरव (वय 5) व गंधर्व (वय ७) या मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात गंधर्वचा मृत्यू झाला. दोघांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले असून, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ही घटना घडली तेव्हा महिलेचा पती कामावर गेला होता. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, चिखली पोलिस अधिक तपास करत आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT