Ladki Bahin Yojana esakal
पिंपरी-चिंचवड

Ladki Bahin Yojana : पात्र महिलांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने घ्या; आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचना

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या केंद्रांवर ज्या पात्र महिलांचे अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यांचे आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घ्यावेत. त्यानंतर ते अर्ज क्षेत्रीय कार्यालयस्तरावर ऑनलाइन पद्धतीने भरावेत,’ अशा सूचना महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी महापालिकेच्यावतीने क्षेत्रीय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, ज्ञानदेव जुंधारे, उपायुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, डॉ. अंकुश जाधव, सीताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, तानाजी नरळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

काय केल्या सूचना ?

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी विविध तांत्रिक अडचणी

  • क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष केंद्रांवर भेट देऊन संबंधित समस्यांचे निराकरण करावे

  • तेथील कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी

  • गरजेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. योग्य समन्वय साधावा

  • अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग द्यावा, आवश्यक उपाययोजना कराव्यात

  • क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नोडल अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून कामकाज

  • दैनंदिन कामाचा अहवाल संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समाज विकास विभागास वेळोवेळी सादर करावा

अर्ज भरण्यापूर्वी हे जाणून घ्या...

  • महापालिकेकडून १० जुलैपासून नियोजन

  • क्षेत्रीय कार्यालयनिहाय विविध ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्रे

  • अर्ज भरताना लाभार्थीच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जातो.

  • तो अर्जात नमूद करणे अनिवार्य आहे

  • पालिकेकडून एक विशिष्‍ट क्रमांक तयार करण्यात येणार

  • त्यावरून लाभार्थींना संपर्क साधला जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT