mulashi sakal
पिंपरी-चिंचवड

मुळशीतील वर्षा पर्यटन ‘लॉक’

लहान-मोठ्या व्यावसायिकांचे सलग दुसऱ्या वर्षी नुकसान

सकाळ वृत्तसेवा

कोळवण : निसर्गाचे वरदान लाभल्याने मुळशी (mulshi) तालुक्यात पावसाळ्यात पर्यटनासाठी रांगा असतात; पण दोन वर्षांपासून येथील पर्यटनाला (Tourism) दृष्ट लागली आहे. यंदा कोरोना (Corona) काळातील बंदमुळे मुळशी तालुक्यात वर्षा पर्यटनही पूर्णपणे बंद झाले. लॉकडाउनमुळे (Lockdown) पर्यटक बंद झाल्याने केवळ पर्यटकांवर पोट अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे दोन वेळचे पोट भरणे अशक्य झाले आहे. (Mulshi Varsha Tourism Locked)

तालुक्यात पावलापावलावर शाकाहारीसह मांसाहारी जेवण देणारी हॉटेल आहेत. त्याचबरोबर घरगुती जेवण पुरवणारी अनेक घरांबरोबरच कृषी पर्यटन केंद्रेही आहेत. येथील बहुतांशी स्थानिकांचा पर्यटकांवरच उदरनिर्वाह चालतो. मोठ्या हॉटेलचालकांसह वडापाव, पाणीपुरी विक्रेते अशा पर्यटनावर आधारित अशा लहान-मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक जणांचे लॉकडाउनमधील लाईटबिल, जागा भाडे, कामगारांचे पगार थकीत असून अनेकांना कर्ज काढून जीवन जगण्याची वेळ आली आहे.

तालुक्यातील मुळशी धरण, टेमघर धरण, ताम्हिणी घाट, पळसे धबधबा, पिंपरी पॉइंट, अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, सहारा सिटी, लवासा सिटी, गिरीवन व पर्यटन परिसरामध्ये पर्यटनाला जाण्यासाठी बंदी केली आहे. कोरोनाचा धोका अजून टळलेला नसून रुग्ण संख्या वाढत आहे. तहसीलदार अभय चव्हाण यांनी मुळशीतील सर्व पर्यटनस्थळावर पर्यटनास बंदी घातली आहे. जेणेकरून पर्यटनामुळे कोरोना संसर्ग वाढू नये.

वन विभागाकडूनही कारवाई

याबाबत कारवाई व गुन्हा दाखल करण्याचे आदेश पौड पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार मुळशी तालुक्यातील भूगाव, घोटावडे फाटा, पौड, माले, मुठा खिंड या ठिकाणी पौड पोलिस ठाण्याकडून नाकाबंदी केली आहे. पूर्णपणे चौकशी करूनच वाहने सोडली जात आहे. काही पर्यटन स्थळे वनविभागाच्या हद्दीत येत असून, सर्व पर्यटनस्थळांना संरक्षित/राखीव वनांचे सर्व नियम लागू होतात. या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून वन विभागाचे अधिकारी कारवाई करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

SCROLL FOR NEXT