Ajit Gavhane sakal
पिंपरी-चिंचवड

Ajit Gavhane Resign : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा राजीनामा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मंगळवारी (ता. १६) आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मंगळवारी (ता. १६) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्‍यांच्‍यासोबत त्यांचे समर्थक शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर व विद्यार्थी विभागाचे शहराध्यक्ष यश साने यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

गव्हाणे, भोसले व भालेकर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तर; साने यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्याकडे दिला आहे.

गव्‍हाणे समर्थकांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती.

त्‍यानंतर त्‍यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, ते व त्यांचे समर्थक २५ माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्‍या नेतृत्‍वाखालील राष्ट्रवादीत उद्या (बुधवारी) प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.

गव्हाणे व त्यांचे समर्थक, पदाधिकारी उद्या बैठक घेणार असून, त्यानंतर ते शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी भेट घेणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले. दहापैकी ८ जागांवर पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला. त्‍यामुळे राज्‍यात पक्षाला सकारात्‍मक वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आगामी विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत.

‘मविआ’तून भवितव्य असल्याने निर्णय

मध्यंतरी गव्हाणे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्‍यानंतर विविध ज्येष्ठ व्यक्ती, समविचारी पक्ष, संघटना, मंडळांच्या गाठीभेटी घेतल्या. गव्हाणे यांनी बदल करावा, असा सूर प्रत्येकाचा होता. आगामी काळात महाविकास आघाडीतून भवितव्य असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT