पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 318 नवे पॉझिटिव्ह, तर एवढे मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवार (ता. 11) सायंकाळी सातपासून रविवारी (ता. 12) सायंकाळी सात वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात 318 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या सात हजार 276 झाली आहे. आज दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यातील पाच जण शहरातील असून, मृतांची संख्या 108 झाली आहे. सध्या दोन हजार 833 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत चार हजार 312 रुग्ण बरे झाले आहेत. त्यात आज बरे झालेल्या 204 जणांचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत एकूण चार हजार 151 पुरुष आणि 3098 महिलांना संसर्ग झालेला आहे. शिवाय संसर्ग झालेल्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक 2853 आहे. शहरात आजपर्यंत 34 हजार 83 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 24 हजार 724 जणांना संसर्ग नसल्याचे आढळून आले आहे. 

11 मार्च ते 31 पर्यंत या 82 दिवसांत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जूनमध्ये 39 जण आणि जुलैच्या पहिल्या बारा दिवसांत मृत्यू 61 जणांचा बळी गेला आहे. आज मृत झालेले रुग्ण पिंपरी (पुरुष, वय 60), आकुर्डी (पुरुष, वय 43 व 68), सांगवी (पुरुष, वय 57), चऱ्होली (स्त्री, वय 61), मारुंजी (पुरुष, वय 48), बीड (पुरुष, वय 95), देहूरोड (स्त्री, वय 46) येथील रहिवासी आहेत. 

पावसाळा सुरू झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं. चिं. मनपामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते, की अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच, पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा. 

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT