Fed up with uncle's sexual harassment niece commits suicide 
पिंपरी-चिंचवड

नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाच्या लैंगिक छळाला कंटाळून पुतणीची आत्महत्या 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : चुलता अश्‍लील वर्तन करीत वारंवार अश्‍लील मेसेज करुन त्रास देत होता. चुलत्याकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून सतरा वर्षीय पुतणीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही नात्याला काळीमा फासणारी घटना भोसरी येथे घडली. 

याप्रकरणी मृत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीच्या चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीची मुलगी सुटीसाठी औरंगाबाद येथे चुलत्याच्या घरी गेली होती. तेथे चुलत्याने तिच्याशी अश्‍लील वर्तन करीत वियनभंग केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलगी भोसरीतील तिच्या घरी आली आल्यानंतरही चुलता वारंवार अश्‍लील मेसेज पाठवून तिला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून मुलीने 6 सप्टेंबरला भोसरीतील इंद्रायणीनगर येथील राहत्या घराच्या इमारतीच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी होऊन ती बेशुद्ध पडली. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, त्या मुलीच्या रूममधील ड्रॉवरमध्ये सापडलेल्या चिठ्ठीत मुलीने चुलता देत असलेल्या त्रासाबाबत तिने नमूद केले होते. त्यानुसार कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून लैंगिक अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

नात्याला काळीमा 
वडिलांसमान असणाऱ्या चुलत्याकडूनच असा प्रकार घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पुतणीबाबत जवळच्याच व्यक्तीकडून असा प्रकार घडल्याने पीडित मुलीसह कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. या धक्‍क्‍यातून सावरू न शकलेल्या मुलीने अखेर जीवनच संपवले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT