The number of newly formed Dehu-Nagar Panchayat members is fixed 
पिंपरी-चिंचवड

नव्याने स्थापन झालेल्या देहू-नगरपंचायत सदस्या संख्या निश्चित

मुकुंद परंडवाल

देहू (पिंपरी) : देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये नुकतेच रुपांतर झाले आहे. नव्याने स्थापन झालेल्या देहू नगरपंचायतीच्या सदस्यांची संख्या 17 निश्चित झाली आहे. येत्या पंधरा दिवसात वार्ड रचना आणि वार्ड आरक्षण निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. दिवसेदिवस देहूची लोकसंख्या वाढत आहे.

सध्या देहूची लोकसंख्या 40 हजारापेक्षा जास्त आहे.त्यामुळे देहूचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आले. ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी सतरा सदस्य होते. नव्याने नगरपंचयातमध्ये 17 सदस्यच संख्या निश्चित झाली आहे. यात अनुसुचित जातीसाठी 3 जागा, अनुसुचित जमातीसाठी 1 जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 5 जागा आणि महिलांसाठी 9 जागा राखीव आहेत. महिलांच्या 9 राखीव जागापैकी दोन जागा अनुसुचित जातीसाठी, तीन जागा नागरिकांच्या मागार प्रवर्गासाठी आणि चार जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरक्षण सोडत पद्धतीने होणार आहे. तसेच अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी सोडत निघालेस सर्वसाधारण महिलांची संख्या 4 ऐवजी 3 होणार आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेले सदस्य संख्याचे विभागीय आयुक्तांचे पत्र 8 जानेवारीला प्राप्त झाले आहे. याबाबत गावकामगार तलाठी अतुल गीते यांनी सांगितले. शासनाचे पत्र प्राप्त झालेले आहे.2011च्या जनगणनेनुसार नवीन नगरपंचायतीमध्ये सदस्य संख्या 17 असणार आहे. येत्या 15 दिवसात वार्ड रचना आणि आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे. देहू नगरपंचायतीचे प्रभारी म्हणून मावळचे तहसिलदारांना कार्यभार देण्यात आला आहे.सध्या नायब तहसिलदार नंदकुमार धनगर कामकाज पाहत आहेत, मात्र सध्या मावळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक सुरु आहेत.त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT