कामशेत (ता. मावळ) : येथील दत्त कॉलनीतील पन्नास वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी दोनच्या या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजले.
प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळे येथील अधिकारी डॉ. सुनील चिद्रावार यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन केले. शहरातील एका नऊ महिन्याच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर आता दत्त कॉलनी मध्ये ५० वर्षीय व्यक्तीस देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कामशेतमधील कोरोना रुग्णांची संख्या दोन झाली आहे. शहराजवळील अहिरवडेत एकजण पॉझिटिव्ह होता. त्याने व शहरातील नऊ महिन्याच्या मुलींने कोरोनावर मात केली आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.