pcmc sakal
पिंपरी-चिंचवड

कांदा, बटाटा, कारली, पावटा स्वस्त

मटारच्या भावात वाढ; बाजारात ९० गाड्यांची आवक

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी बाजारात फळभाज्यांची आवक स्थिर होती. कांदा, बटाटा, दोडका, कारली, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि पावट्याच्या भावात घट झाली, तर मटाराच्या भावात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. (PCMC News)

मार्केटयार्डात रविवारी ८० ते ९० गाड्यांची आवक झाली. मध्यप्रदेशातून ७ ते ८ टेंपो गाजर, गुजरात व कर्नाटकातून ४ ते ५ टेंपो कोबी, आंध्र प्रदेश व तमिळनाडूतून ५ टेंपो शेवगा, गुजरात, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून १६ टेंपो हिरवी मिरची, मध्यप्रदेशातून २ टेंपो भुईमूग शेंग, गुजरातमधून १२ ट्रक लसूण आणि आग्रा, इंदौर, गुजरातसह स्थानिक भागातून बटाट्याची ७० ते ७५ ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले १२०० गोणी, कोबी ६ टेंपो, फ्लॉवर १२ टेंपो, भेंडी ६ टेंपो, गवार ५ टेंपो, सिमला मिरची १२ टेंपो, टोमॅटो ७ हजार पेटी, तांबडा भोपळा ६ टेंपो, हिरवी मिरची ३ ते ४ टेंपो, पावटा ५ टेंपो, पुरंदर, वाई व साताऱ्याहून मटार ४०० ते ५०० गोणी, भुईमूग शेंग १ हजार पोती आणि कांद्याची ६० ते ७० ट्रक इतकी आवक झाली.

फुलांचे भाव ‘कोमेजले’

मार्केट यार्डातील फूलबाजारात कृष्णजन्माष्टमीमुळे फुलांच्या आवकेमध्ये वाढ झाली. मात्र मागणी तुलनेने कमी होती. त्यामुळे भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती फूल बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. फुलांचे भाव पुढीलप्रमाणे (किलोचे) : झेंडू : १०-३०, गुलछडी : ७०- १२०, कापरी: १०-३०, शेवंती : २०-५०, ऑॅस्टर : ४-६, गुलाबगड्डी (बारा नगाचे दर) : १५-२५, गुलछडी काडी : २०- ५०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, लिलिबंडल (५० काडी) : ८-१२, जरबेरा : ४०-६०, कार्नेशियन : ६०-१२०.

भाजीपाल्याला मागणी कमी आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांचे दर उतरले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गाळ्यावर शेतमाल शिल्लक राहत आहे.

- अमोल घुले, उपाध्यक्ष, आडते असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT