जुनी सांगवी - सॅनिटरी नॅपकिन कचऱ्याच्या विलगीकरणासाठी कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. 
पिंपरी-चिंचवड

सॅनिटरी नॅपकिन विलगीकरणासाठी कागदी पिशव्या

रमशे मोरे

जुनी सांगवी - मासिक पाळीत होणारा सॅनिटरी नॅपकिनचा वापर, त्यातून निर्माण होणारा कचरा व महिलांमधील न्यूनगंड कमी व्हावा, यासाठी सॅनिटरी नॅपकिन कचऱ्याचे विलगीकरण व्यवस्थित होण्यासाठी येथील सखी महिला बचत गटाच्या माध्यमातून ‘आरंभ’ या नावाने कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यात येत आहे. या स्तुत्य उपक्रमास महिला व आरोग्यक्षेत्रातून भरभरून दाद मिळत आहे, असे या संकल्पनेच्या कर्त्या मीना शितोळे यांनी सांगितले.

काय आहे उपक्रम?
पेपर व इतर रद्दीपासून ही पिशवी तयार केली जात आहे. सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी रद्दी व प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो. हीच बाब लक्षात घेऊन याचा कचरा ओळखता यावा. त्यातून सर्वांनाच सुरक्षिततेची काळजी घेता यावी, यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरासाठी रद्दीपासून या कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यात येत आहे. याचबरोबर कापडी पिशव्याही बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्याचे काम सुरू आहे.

महिलांना मिळाला रोजगार
लॉकडाउन काळात अनेकांना मूळ उद्योग व व्यवसाय सोडून इतर कामे करणे भाग पडले. बहुतांश लोक भाजी विक्रीकडे वळल्याने महिलांना घरबसल्या कागदी पिशव्या तयार करता याव्या ही संकल्पना पुढे आली. खरेदीसाठी वापरण्यात येणाऱ्या कापडी पिशव्या, कागदी पिशव्या यासोबतच सॅनिटरी नॅपकिन कचऱ्याची समस्या ही सुरक्षित व सुकर होण्यासाठी ‘आरंभ’ या नावाने कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यात आली. ही पिशवी कचरा विलगीकरणासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यावरील रेडडॉट असलेल्या स्टिकरमुळे ही पिशवी सहज ओळखता येते. यामुळे स्वच्छता कर्मचारी, कचरा विलगीकरण सुरक्षित करू शकतील. जुनी सांगवी येथे सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आरती राव, अश्‍विनी दरेकर, मीना शितोळे आदी महिला उपस्थित होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थिती काय?

  • सोसायट्यांमधून पिशव्यांना वाढली मागणी
  • आतापर्यंत एक लाख पिशव्यांची निर्मिती
  • पुण्यातील एकट्या सिंध सोसायटीत दहा हजार पिशव्यांच्या मागणी
  • एक किलो रद्दीत १०० ते ११० पिशव्या होतात
  • एक मीटर कापडात दोन कापडी पिशव्या होतात
  • एका महिलेला शेकड्यामागे ६० रुपये 
  • सखी महिला बचत गटाचे एकूण ३५ गट 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balen Shah: सीमा वादावर बालेन शाहांना ‘सायलेंट मोड’वर कोणी टाकलं? नेपाळमध्ये मोठा राजकीय निर्णय, आता फक्त शिशिर खनालच बोलणार

Chess Champion: कार्लसन विसरा, जगाला हादरवणारा 'हा' भारतीय खेळाडू ठरतोय सर्वात धोकादायक; दिग्गजाचा मोठा दावा!

'गुलकंद'नंतर समीर चौघुले दिसणार 'साखर खाल्लेला माणूस' सिनेमात ! सोशल मीडियावर पोस्टर रिलीज

Horoscope : येत्या 72 तासांत बनतोय धनयशस्वी योग! 'या' 5 राशींना मिळणार विशेष लाभ; आर्थिक भरभराटीसह कुटुंबात येईल मोठी खुशखबर

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची दिशा ठरणार - संजय राऊत

SCROLL FOR NEXT