Passengers prefer private travels even though tickets are more than st
Passengers prefer private travels even though tickets are more than st sakal
पिंपरी-चिंचवड

उन्हाळी सुट्यांमुळे ‘ट्रॅव्हल्स’ फुल्ल!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : उन्हाळी सुट्यांमुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर २५ टक्के वाढविले आहे. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे डिझेलचे दर वाढल्याने तिकीट वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगताहेत. विशेष म्हणजे, लालपरीपेक्षा ट्रॅव्हल्सचे दर जास्त असले तरी प्रवासी ट्रॅव्हल्सनेच प्रवास करणे पसंत करीत आहे. कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात सापडला होता. आता कुठे हळूहळू ट्रॅव्हल्सची चाके पूर्वपदावर येत आहेत. दिवसेंदिवस डिझेल दरवाढीचा फटका बसत असून, वाढत्या महागाईनुसार ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत. चालकांचा, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्चामुळे तिकिटाचे दर वाढले आहेत. प्रवाशांच्या खिशाला मात्र यामुळे कात्री लागत आहे.

या काळात खासगी वाहनांची चलती असून, प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ पोचत आहे. उन्हाळी सुटीच्या निमित्ताने अनेक जण मामाच्या गावाच्या जाण्याच्या तयारीला लागले आहेत. अन्य कामानिमित्ताने परगावी असलेले नागरिक आपल्या मूळगावी परततात. यानिमित्त सर्वाधिक विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याचाच फायदा घेत ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटांचा मनमानी दर वाढवला आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, वाकड, सांगवी, डांगे चौक येथून बस निघतात. रात्री नऊ ते पहाटे पाच या दरम्यान दूरच्या ट्रॅव्हल्स धावतात, याचे दर एसटीच्या तुलनेने जास्त आहे. तरीदेखील याला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. दिवसाला एकच फेरी होत आहे.

याचा बसला फटका

ऐन सुटीच्या हंगामात एसटी सेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक मार्गावर बस अद्याप सुरू नाही. लालपरीला प्रवाशांचा प्रतिसाद किरकोळ लाभत आहे. अन्य विभागाच्या गाड्या प्रवाशांविना धावत आहेत. सामान्यपणे ३५ एसटी गाड्या धावत आहेत. याच्या जवळपास १० फेऱ्या होतात. ज्या काही मोजक्या गाड्या धावत आहेत, त्यांना पुणे-मुंबई, पुणे-सोलापूर व पुणे-कोल्हापूर आदी मार्गांवर जेमतेम प्रतिसाद मिळत आहे.

मार्गावर जास्त प्रतिसाद

पुण्याहून रात्री सुटणाऱ्या बहुतांश ट्रॅव्हल्सला सर्वच मार्गांवर चांगला प्रतिसाद लाभत आहे. ट्रॅव्हल्सला मात्र विदर्भ, खानदेश, मराठवाडा या मार्गावर चांगला प्रतिसाद लाभत आहे. तसेच शॉर्टरूटच्या पुणे-कोल्हापूर, पुणे-सातारा, पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, पुणे-पणजी, पुणे-सोलापूर आदी मार्गांवर चांगला प्रतिसाद आहे.

ट्रॅव्हल्सला प्रवाशाचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सुटीच्या हंगामात २५ टक्के दर वाढ केली आहे. त्यापैकी १० दरवाढ ही डिझेलच्या दरवाढीमुळे आहे. एसटीच्या गाडी बंद असल्याने प्रवाशांना पर्यायाने ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे.

- रमेश वाघमारे, अध्यक्ष निगडी हॉकर्स ट्रॅव्हल्स असोसिएशन

दरपत्रक

जिल्हा - एसी बस - नॉनएसी बस

-विदर्भ - १५००-१६००-१०००-१२००

-मराठवाडा- १३००-१४००-९००-१२००

-खान्देश - १२००- १३०० - ९०० -१०००

-कोल्हापूर -५००-६०० -४००

-गोवा - १५००-१८०० - १२००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT