प्राधिकरण विलीनीकरणावर आयुक्तांची चुप्पी; दुसऱ्या टप्प्यात ६२०९ घरे
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) २०२१-२०२२ चा ७७८ कोटी ८७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. प्राधिकरणाची ३४८ वी सभा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २१) झाली. आरंभीची शिल्लक ९०१.६९ कोटी असून, भांडवली खर्च ६८१.२७ कोटी व महसुली जमा ४.४० कोटी इतकी आहे. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे पेठ क्रमांक १२, टप्पा क्रमांक दोनमध्ये ६३०९ घरांचा शंभर कोटींचा गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहे. पीएमआरडीए विलीनीकरण आरक्षित, मोकळे व वापरलेले भूखंड यावर पीसीएनटीडीए आयुक्तांनी चुप्पी साधली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पीसीएनटीडीएचा अर्थसंकल्प प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सदस्य सचिव बन्सी गवळी यांनी सभेपुढे सादर केला. प्राधिकरणाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक देशमुख यावेळी उपस्थित होते. अर्थसंकल्प ७७८ कोटी ८७ लाख ९२ हजार रकमेचा असून, त्यात ७७० कोटी ९ लाख २२ हजार एवढा खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच ८ कोटी ७८ लाख ७० हजार शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदी
नवीन विकासकामे
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.