Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 103 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

  • पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 103 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 245 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी 103 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 245 झाली आहे. आज 96 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 95 हजार 951 झाली आहे. सध्या एक हजार 504 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 790 आणि शहराबाहेरील 750 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या रुग्णालयांत 627 रुग्ण उपचार घेत आहेत. 877 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 800 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार 783 जणांची तपासणी केली. 789 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख चार हजार 54 जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

चिखलीत साकारणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय  

आज एक हजार 568 संशयित रुग्णालयात दाखल झाले. चार हजार 682 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एक हजार 31 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. दोन हजार 561 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

रिक्षा भाडे मीटरप्रमाणे न आकारल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तांचा इशारा​

आजपर्यंत पाच लाख 98 हजार 23 संशयित रुग्णालयात दाखल झाले. चार लाख 97 हजार 747 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पाच लाख 94 हजार 253 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates in pimpri chinchwad 103 new cases found

Tags
टॉपिकस
Topic Tags: