
ऑफिसमध्ये शिरून पिस्तुलाच्या धाकाने तरुणीचे भर दिवसा अपहरण केल्याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पिंपरी : ऑफिसमध्ये शिरून पिस्तुलाच्या धाकाने तरुणीचे भर दिवसा अपहरण केल्याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अपहरण झालेल्या तरुणीने स्वतः न्यायालयात हजर राहून शपथपत्र सादर केले आहे. त्यात ते अपहरण नसून मी माझ्या मर्जीने तरुणासोबत गेले असल्याचे म्हटले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- चिखलीत साकारणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय
याबाबत तरुणीच्या वडिलांनी चिंचवड पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 19) फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एका कार्यालयात घुसून एका तरुणाने 23 वर्षीय तरुणीचे पिस्तुलाच्या धाकाने अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरुणाचे तरुणीसोबत मैत्रीचे संबंध असून, तरुणी त्याला नकार देत असल्याने त्याने हे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
- रिक्षा भाडे मीटरप्रमाणे न आकारल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तांचा इशारा
त्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले. मात्र, त्यावेळी त्या तरुणीने न्यायालयात येऊन शपथपत्र सादर केले. त्यात तिने म्हटले आहे की, हे अपहरण नसून मी माझ्या मर्जीने त्या तरुणासोबत गेले. तरुणासोबत आपले प्रेमसंबंध असून, त्याला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे आपण त्याच्यासोबत गेल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. या शपथपत्रामुळे या अपहरण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.