corona1 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडकरांसाठी नवी नियमावली; आयुक्तांच्या आदेशामुळे निर्बंध वाढले

सकाळन्यूजनेटवर्क

पिंपरी- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी रविवारी दुपारी नवीन आदेश काढला. त्यानुसार, मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. खासगी कार्यालयांनी किंवा आस्थापनांनी शक्यतो वर्क फ्रॉम होम करावे. शक्य नसल्यास खाजगी कार्यालयांत पन्नास टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवावी. रविवारपासून (ता. २८) रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना फिरण्यास बंदी असेल. सार्वजनिक वाहतूक सेवा पीएमपी बसमध्ये पन्नास टक्के प्रवासी क्षमता असावी, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.

आयुक्तांनी आदेशात काय म्हटलंय

- दुकाने, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे सामाजिक अंतर राखणे
-सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास  हजार रुपये दंड. दुकानांमध्ये एका वेळी केवळ पाच व्यक्ती सामाजिक अंतर ठेवून असाव्यात. पान, तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करण्यास मनाई आहे. 
-कार्यालये, खासगी आस्थापना यांनी शक्यतो वर्क फ्रॉम होम करणे. 
-कामाचे ठिकाणी, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखणे, त्यासाठी आखणी करणे, प्रवेशद्वाराजवळ हँडसॅनिटायझर,   आॅक्सिमीटर ठेवावे. वारंवार निर्जंतुकीकरण करणे. 
-रविवार, 28 मार्च रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांना बंदी. अन्यथा प्रत्येकी हजार रुपये दंड. 
-सार्वजनिक ठिकाणी रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद. आदेशाचा भंग केल्यास प्रत्येक व्यक्ती हजार रुपये दंड
-अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, सिनेमागृहे, नाट्यगृहे रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत बंद.
-हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहील. गर्दी झाल्यास  प्रसंगी बंद केल्या जातील.
-सभा-संमेलने, भूमिपूजन व उद्घाटने बंद.
-लग्न समारंभ 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. अन्यथा मालकांवर कारवाई
-अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी, त्यांच्याशी निगडित विधींना वीस लोकांपर्यंत परवानगी.
-सर्व उद्याने बंद. नियमांचा भंग केल्यास कारवाई 
-होम आयसोलेट नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, दोन अधिकारी यांना माहिती देणे बंधनकारक.
-विलगीकरण कालावधीत दरवाजाचा दर्शनी भागावर फलक लावण्यात यावा.
-पॉझिटीव्ह रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे. आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांची जबाबदारी
-पॉझिटीव्ह रुग्णांच्या घरातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. आवश्यक असल्यास मास्क आवश्यक.
-सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपी बसमध्ये पन्नास टक्के प्रवासी क्षमता. अन्यथा पाचशे रुपये दंड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT