देवदत्त पटनायक sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri- Chichwad : विख्यात लेखक देवदत्त पटनायक यांचे संस्कृती आणि जागतिकीकरण' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्याख्यान विद्यार्थ्यांशी साधला सुसंवाद

सकाळ वत्तसेवा

वाकड: चिंचवड येथील एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये कॉलिन्स लर्निंग इंडिया आणि हार्पर कॉलिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ख्यातनाम लेखक आणि पौराणिक कथाकार देवदत्त पटनायक यांच्या संस्कृती आणि जागतिकीकरण या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधत त्यांच्या शंकाचे निरसनही केले. पटनायक यांच्या सोबतच्या या भेटीने विद्यार्थी देखील भारावले होते. पटनायक यांनी आधुनिक जगातील पौराणिक कथांच्या प्रासंगिकतेवर सांगोपांग व उत्कट विचार व्यक्त केले.

त्यांनी खाद्यपदार्थ, पारंपारिक विधी, पौराणिक कथा-कल्पनांद्वारे संस्कृतीच्या सारावर सुंदरतेने प्रकाश टाकला.नते म्हणाले, पुराण कथा म्हणजे इतर लोकांच्या सत्यांबद्दल शिकणे आणि जेंव्हा मी इतर लोकांच्या सत्यांबद्दल शिकतो तेंव्हा जागतिकीकरणाकडे जातो. या विषयाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अतिशय उत्साही असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत त्यांना जगभरातील इतिहास आणि पौराणिक कथांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

संस्कृतीच्या अभ्यासपूर्ण दृष्टीकोनावर भर टाकल्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांना तीक्ष्ण, चटकदार आणि नम्रपणे उत्तरे देत सांस्कृतिक दुष्टीकोणातुन जगाकडे कसे पहायचे हे सांगितले. संस्कृती आणि सभ्यता यांच्यातील योग्य फरक दर्शवला. मानव निसर्गात कसा जगतो हे होय, सभ्यता म्हणजे जेव्हा लोक एकमेकांशी कथा, कल्पना, अन्न, सेवा यासारख्या गोष्टींची देवाणघेवाण करतात ही संस्कृती होय. शेवटी त्यांनी संस्कृती आणि जागतिकीकरणाचा हा प्रवास सुसंस्कृत कराल. अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्य डॉ. अमृता वोहरा म्हणाल्या, पटनायक या प्रेरणादायी

व्यक्तीमत्वामुळे आम्हाला आमचे स्वता:च्या व इतरांच्या संस्कृतीबद्दल अधिक माहिती मिळाली. आमच्या शाळेत वाचनाच्या सवयीला आम्ही खुप महत्व देतो. पटनायक यांच्या सोबतच्या आजच्या सत्राद्वारे, विद्यार्थ्यांना पौराणिक कथांचे जग कळाले. आणि ते देखील त्यांच्या कल्पनेला उधाण देणाऱ्या त्यांची विश्वदृष्टी वाढवणाऱ्या शैलीद्वारे. कार्यक्रमानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे पुस्तके भेट दिली तर पत्रकारांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT