diwali sakal media
पिंपरी-चिंचवड

Pimpri chinchwad : आकाशकंदिलांनी बाजारपेठेला झळाळी

प्रत्येकाला तेजोमय लख्ख प्रकाशात दिवाळी साजरी करायची असते. खऱ्या अर्थाने दिवाळी सजावटीला सुरुवात होते, ती आकाशकंदिलापासून

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : प्रत्येकाला तेजोमय लख्ख प्रकाशात दिवाळी साजरी करायची असते. खऱ्या अर्थाने दिवाळी सजावटीला सुरुवात होते, ती आकाशकंदिलापासून. अगदी गोरगरिबांच्या झोपडीपासून ते टोलेजंग बंगल्यावरही आकाशकंदील लागतो. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी बाजारपेठेत आकाशकंदीलाने लख्ख झळाळी आली आहे. कोरोना संसर्ग बऱ्याच अंशी कमी झाला आहे. त्यामुळे, या वर्षी बाजारपेठेत अधिक प्रमाणात आकाशकंदील खरेदीचा उत्साह दिसून आला. बाजारपेठेतील कंदिलाच्या आकर्षक डिझाइन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पिंपरी-चिंचवड बाजारपेठेत आकाशकंदील छोटे-मोठे मिळून, किरकोळ विक्रेते ५० ते ६० आहेत. यावर्षी डिझेल महागल्याने वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यामुळे, पुणे तसेच पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी कंदिलामागे दहा टक्क्यांनी किमती वाढविल्या आहेत. तसेच जीएसटीचाही खर्च आहे. अंदाजे १०० ते १२५ प्रकार कंदिलामध्ये बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यामध्ये हॅंडमेड व रेडीमेड तसेच पारंपरिक कंदिल विक्रीसाठी आहेत. हॅंडमेड कंदील काही अंशी महाग आहेत तर रेडीमेड कंदील ५० रुपयांपासूनपुढे विक्रीला आहेत. यातही लहान, मोठे तसेच जम्बो कंदील विक्रीला आहेत. याच्या किमती ५५० रुपयांपर्यंत आहेत. कागदी, प्लॅस्टिक, तसेच कापडी कंदील विक्रीला आहेत.

वेलवेट, बलून व थ्रीडींनाही मागणी

आकाशकंदिलाच्या किमती ६० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत आहेत. तसेच छोटे कंदीलही डझनमध्ये विक्रीला आहेत. यामध्ये कुंदन, जाळीचे, लाकडी, झुरमुळ्या, वेलवेट, बलून, थ्रीडी व सर्वाधिक मागणी असलेले पारंपरिक कंदील बाजारपेठेत आले आहेत. त्याचबरोबर राजवाडी हंडी, चटई फ्लॉवर, पाकळ्या, षटकोनी, कॅनव्हास प्रिंटेड, खणाच्या डिझाइनमधील व इको फ्रेंडली कंदील बाजारपेठेत आले आहेत.

"कोरोनामुळे बाजारपेठ काही अंशी थंडावली आहे. सकाळी साडेआठपासून दुकान लावले आहे. परंतु, या वर्षी ग्राहक दर पाडून मागत आहेत. पुढील आठवड्यात विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत."

- हेमलता मांडगे, आकाशकंदील विक्रेत्या, पिंपरी कॅम्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Latest Marathi News Updates : ओबीसी समाज बांधवांची बैठक ठरली फिकी; रिकाम्या खुर्च्या ठळकपणे जाणवल्या

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT