Suicide 
पिंपरी-चिंचवड

Breaking : चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवडगावात तरुणाने स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून घेतल्याची घटना रविवारी (ता.२८) रात्री उशिरा घडली. गोळी झाडून घेतलेला तरुण पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा मुलगा आहे. प्रसन्न चिंचवडे (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे या तरुणाचे नाव आहे.

प्रसन्नने त्याच्या वडिलांच्या पिस्तूलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याला उपचारासाठी तात्काळ थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत प्रसन्न गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला थेरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच नातेवाईक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली. आणि उपचारादरम्यान त्याचा पहाटे मृत्यू झाला. गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, प्रसन्न नवी कार खरेदी करण्यासाठी रविवारीच शोरुममध्ये जाऊन  आला होता, पण घरी आल्यावर त्याने स्वत:वर गोळी का झाडून घेतली, याबाबत कुणालाच काही कल्पना नाही. त्याचा मनमिळावू आणि शांत स्वभाव होता, त्यामुळे आत्महत्या करण्यासाठी त्यानं का पाऊल उचललं असावं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

- पिंपरी-चिंचवडमधील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT