Covaxin
Covaxin Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : बुधवारी कोव्हॅक्सिन लशीचे ३२०० डोस; कोव्हिशिल्ड लस उपलब्ध नाही

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेकडे कोव्हॅक्सिन लशीचे तीन हजार २०० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यातील दोन हजार ४०० डोस १८ ते ४४ वयोगटातील आणि आठशे डोस ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी आहेत. ते देण्याची व्यवस्था बुधवारी (ता. ११) १६ केंद्रांवर केली आहे. दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे. कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झालेली नाही, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे.

वयोगट १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सावित्रीबाई फुले स्कूल भोसरी, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, अहिल्यादेवी होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुणालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी व जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर तीनशे डोस उपलब्ध आहेत. त्यातील दोनशे डोस पहिला डोस घेणाऱ्यांसाठी व शंभर डोस दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत.

४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना प्राथमिक शाळा क्रमांक ९२ मोरेवस्ती चिखली, इएसआय हॉस्पिटल मोहननगर, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, इंगोले शाळा पिंपळे निलख व प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड या केंद्रांवर लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर डोस उपलब्ध आहेत. त्यातील प्रत्येकी ५० डोस पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहेत.

मात्र, पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. काही डोस ऑनलाइन नोंदणी करून तर, काही डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन दिले जातील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT