Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad Sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri-Chinchwad : एल अ‍ॅण्ड टी कामगारांच्या हक्कासाठी उद्या एमआयडीसी बंद

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : तळेगाव एमआयडीसीमधील एल अ‍ॅन्ड टी डिफेन्स कंपनी व्यवस्थापनाविरोधात स्थानिक भुमीपुत्र कामगारांनी पुण्यातील अप्पर कामगार आयुक्तालयासमोर गेल्या 42 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने आता आमदार सुनील शेळके यांनी कामगारांच्या पाठीशी उभे रहात उद्या शुक्रवारीस्थानिक भुमिपुत्रांंना सोबत घेऊन तळेगाव एमआयडीसी बंदची हाक दिली आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या तळेगांव प्रकल्पातून 16 ऑक्टोबर 2021 रोजी पासून बदली करण्यात आलेल्या सर्व कामगार सभासदांना त्यांच्या पूर्वीच्याच कामाच्या

जागेवर संपूर्ण सेवा सलगतेसह काम देण्यात यावे. मधल्या काळातील संपूर्ण वेतन कामगारांना देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच पुणे औद्योगिक न्यायालयाने गेल्या 14 मार्च 12 एप्रिलला दिलेल्या आदेश हुकूमाचे पालन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी मावळ तालुक्यातील एकुण 236 कामगार आपल्या हक्काच्या नोकरीसाठी व न्यायासाठी कामगार कामगार आयुक्तांलयासमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात देखील तळेगाव एमआयडीसीत एल अ‍ॅण्ड टी कंपनीसमोर बेमुदत उपोषण याच कामगारांकडून करण्यात आले होते. मात्र,कंपनी व्यवस्थापन ऐकायला आणि सरकारी प्रशासन ठोस पावले उचलायला तयार नाही.कामगार आयुक्तालयाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार्या एल अ‍ॅण्ड टीकंपनीची सखोल चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सचोटीने प्रयत्न करावेत अशी या कामगारांची मागणी आहे.

याच मागणीला पाठींबा देत आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आंदोलनात उडी घेतली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव मावळ येथील पुजा गार्डन जवळील एमआयडीसी फाट्यावर होणा-या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून याकामी लक्ष घालून कामगारांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनीही पुण्यात जाऊन आंदोलनकर्त्या कामगारांची भेट घेऊन पाठींबा दिला आहे. गेला जवळपास दिड महीना याप्रश्नी ढिम्म भुमिका घेणारे कामगार आयुक्तालय आणि एल अ‍ॅण्ड टी प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT