पिंपरी-चिंचवड

'राजमाता जिजाऊ भवन खाली करा', महापालिकेचे आदेश अन् ज्येष्ठांचा संताप

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी- संत तुकाराम नगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन इमारतीमधील हॉलचा गेल्या १० वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र म्हणून वापरत करत आहेत. मात्र, महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाने अचानकपणे संबंधित हॉल खाली करण्यासाठी त्यांना नोटीस बजावली आहे. परिणामी, आम्ही जायचे कुठे? असा प्रश्‍न ज्येष्ठ नागरिक करत आहेत.

संत तुकाराम नगर परिसरात महापालिकेची राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनाची इमारत आहे. ही मिळकत ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत मालकीची आहे. पण, गेल्या १०- १५ वर्षांपासून संत तुकाराम नगर संघाचे ज्येष्ठ नागरिक तिचा वापर करत आहेत. या ज्येष्ठांना विरंगुळा केंद्र नसल्याने स्थानिक लोकप्रतिनींधीनी त्यांना ही जागा वापरण्यास दिली आहे.

याठिकाणी त्यांची साप्ताहिक सभा, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे होतात. पण, अचानक महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाने ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षांच्या नावाने हॉलच्या दरवाज्याला नोटीस चिकटवली. अनधिकृत घुसखोरी न होण्याच्यादृष्टीने महापालिका आयुक्तांनी वेळोवेळी आदेश परिपत्रके पाठवली आहेत. त्यानुसार, महापालिका मालकीच्या सांस्कृतिक केंद्रातील हॉल किंवा खोली जागा वितरणासंबंधीचे आदेश पडताळणी करुन अनधिकृत वापर करणाऱ्यांवर उचित कारवाई करण्याबाबत पत्राद्वारे कळविल्याचे नोटिसमध्ये म्हटले. त्यानुसार, संबंधित हॉलला कुलूप लावण्यात आले होते.
दरम्‍यान, सांस्कृतिक केंद्रातील हॉल वापरण्यासाठी महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे मागणी अर्ज करण्याची सूचना ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे यांनी केली होती.

‘‘ज्येष्ठ नागरिकांच्या विरोधात स्थानिकांकडून तक्रार आली होती. त्याबद्दल, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षांकडे संबंधित राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनाच्या कागदपत्रांची माहिती मागवली होती. ज्येष्ठांकडे ताबा पावती नव्हती. तरी सध्‍या ज्येष्ठ नागरिक जागेचा वापर करत आहे.’’- उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय

‘‘महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाने ही जागा ताब्‍यात घेतल्यावर आम्हा ज्येष्ठांनी कुठे नवा हॉल शोधायचा? हीच जागा आम्हाला अधिकृत विरंगुळा केंद्र म्हणून वापरण्यासाठी द्यावी. ही महापालिकेकडे विनंतीवजा मागणी आहे.’’- निशीकांत गोडबोले, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संत तुकाराम नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT