Corona Virus Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कोरोना संसर्ग एक टक्क्यापेक्षा कमी

कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या जिल्ह्यांत कडक निर्बंध लागू करावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या जिल्ह्यांत कडक निर्बंध लागू करावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचा विचार केल्यास गेल्या आठ दिवसांत सरासरी पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. मात्र, खबरदारी म्हणून महापालिकेने परदेशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. कोरोना बरोबरच ओमिक्रॉन व्हेरिएंटचीही तपासणी केली जात आहे.

शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून कमी झाले आहे. तुलनेने उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय, लसीकरणावर महापालिकेने भर दिला आहे. मात्र, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नायजेरियाहून आलेली एक महिला व तिच्या दोन मुलींना आणि त्यांच्या संपर्कातील सात जणांना ओमिक्रॉनच्या संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळून आल्याने गेल्या आठवड्यात भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यातही केरळसह अन्य दहा राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये पुन्हा संसर्ग वाढू लागल्याने पाच टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी दर असलेल्या ठिकाणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कडक निर्बंध लागू करण्याची सूचना केली आहे.

सण, उत्सव, सभा, समारंभ, लग्न आदी ठिकाणीही उपस्थितीवर बंधने येणार आहेत. त्यामुळे शहरातील निर्बंधांबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता पाच डिसेंबरपासून रविवारपर्यंत (ता. १२) शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर सरासरी एक टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे.

लॉकडाउन किंवा कडक निर्बंध कोणालाच परवडणार नाहीत. अनेकांनी कर्ज काढून उद्योग-व्यवसाय पुन्हा उभारले आहेत. कामगारही परतले आहेत. ते पुन्हा गावी गेल्यास ऑर्डर असूनही कामे होणार नाहीत. उद्योजकांनी ‘माझी कंपनी माझी जबाबदारी’ ठरवून कामगारांना सुरक्षा साधणे पुरवावीत. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास निर्बंधांची वेळच येणार नाही.

- संजय लेंडवे, लघुउद्योजक, भोसरी

आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूंचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महापालिकेने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परदेशातून शहरात आलेल्या प्रवाशांचे क्षेत्रीय कार्यालयास्तरावर सर्वेक्षण सुरू आहे.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT