Google Form Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : विद्यार्थ्यांवर होतेय गुगल फॉर्मची सक्ती

शहरात विविध माध्यम आणि बोर्डाच्या ६५४ शाळा आहेत. यामधून पहिली ते बारावीच्या ३ लाख ५३ हजार ६७८ च्या आसपास विद्यार्थी संख्या आहे.

आशा साळवी

पिंपरी - सध्या शाळांमधून विद्यार्थ्यांकडून कौंटुबिक माहिती मागविण्यात येत आहे. त्यात पालकांनी किती कोरोना प्रतिबंधक डोस घेतले आहेत? १८ वर्षावरील कुटुंबातील पालकांसह सर्व सदस्य संख्या किती? अशी माहिती मागवली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांवर गुगल फॉर्मची सक्ती केली जात आहे. परिणामी, पालक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

शहरात विविध माध्यम आणि बोर्डाच्या ६५४ शाळा आहेत. यामधून पहिली ते बारावीच्या ३ लाख ५३ हजार ६७८च्या आसपास विद्यार्थी संख्या आहे. शाळांकडून आवश्यक असणाऱ्या माहितीसाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आले आहेत.

मुख्याध्यापक, शिक्षकांकडून नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या सूचना जारी केल्या जातात. त्याप्रकारे आता गेल्या आठवड्यापासून काही शाळांनी विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरून देण्याची मागणी केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी माहिती भरली नाही, अशा मुलांना दंड आकारण्यात येत असल्याच्याही तक्रारी आल्या आहेत. त्या फॉर्ममध्ये पालकांकडून कोरोना प्रतिबंधक डोसची माहिती मागवली आहे. त्यात पालकांचा संपर्क क्रमांक, १८ वर्षावरील कुटुंबातील पालकांसह सर्व सदस्य संख्या, पहिला डोस न घेतलेल्यांची संख्या, दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या किंवा दोन्ही डोस न घेतलेल्यांची संख्या किती अशी माहिती मागविली आहे. शाळांच्या या सक्तीला पालक वैतागले आहेत. अनेक पालकांकडे मोबाईल नाहीत. तसेच काहींना नेट सुविधा नाही. शाळांकडून ही माहिती कशासाठी मागविली जात आहे, असा प्रश्‍न पालकांना पडला आहे.

शहरातील शाळास्थिती

  • १२८ - महापालिका

  • ३०७ - स्‍वयंअर्थसाहाय्यित

  • २ - केंद्रीय विद्यालय

  • २२ - अंशतः खासगी अनुदान

  • ७ - समाजकल्याण खासगी अनुदान

  • १ - आदिवासी खासगी अनुदान

  • १३५ - खासगी अनुदान

  • ६२ - खासगी विनाअनुदानित

  • ८ - अनधिकृत

अशा प्रकारची सक्ती केली जाते, अशा विद्यार्थी- पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी कराव्यात. अशा प्रकारे शासनाकडून कोणतीही माहिती मागवलेली नाही.

- पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

काही शाळांमधून सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून माहिती देण्याबाबत सक्ती केली जात आहे. शाळांना कौंटुबिक माहिती कशाला हवी आहे, त्यामुळे आम्ही वैतागलो आहोत. बऱ्याच पालकांचे डोस पूर्ण झालेले नाहीत.

- आकाश जैन, पालक, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलांनी अभ्यास करावा, आंदोलनाच्या भानगडीत पडू नये! मोदींना अपशब्द बोलणाऱ्या तरुणीची आई काय म्हणाली? पाहा Video

Indonesia Ferry Fire: इंडोनेशियात प्रवासी जहाजाला भीषण आग! ५ जणांचा मृत्यू, ४१ बेपत्ता, शोध सुरू, कशी घडली घटना?

Latest Marathi News Live Update : 'मुंबई कोस्टल रोड नॉर्थ' प्रकल्पाची पाहणी केली

Police Station Chaos: मित्राला सोडवण्यासाठी सहकारनगर पोलिस ठाण्यात गोंधळ, तोडफोड व पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी; तरुण अटकेत

Youth Empowerment: युवकांनी स्वावलंबी होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळा : महादेव जानकरांचा संदेश

SCROLL FOR NEXT