Ganpati Immersion Sakal
पिंपरी-चिंचवड

गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित पिंपरी, हिंजवडीतील वाहतुकीत बदल

गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्त पिंपरी व हिंजवडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्त पिंपरी व हिंजवडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

पिंपरी - गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्त पिंपरी व हिंजवडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

पिंपरी चौकातून शगुन चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने पिंपरी पुलावरून उजवीकडे भाटनगरमार्गे इच्छितस्थळी जातील . मोरवाडीमार्गे एम्पायर इस्टेट येथील सेंट मदर टेरेसा पुलावरून काळेवाडी मार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच काळेवाडी पुलावरून येणाऱ्या वाहनांना डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद असेल. ही वाहने काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म मार्गे मुंबई-पुणे महामार्गाने जातील . पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यास प्रवेश बंद असेल. या मार्गावरील वाहने पिंपरी चौकाकडून सेवारस्त्याने क्रोमा शोरूमसमोरुन पुढे जातील. हा बदल ४, ६, ८ व ९ सप्टेंबरला सायंकाळी चार ते रात्री बारा या वेळेसाठी असेल.

तसेच हिंजवडी परिसरातीलाही वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रिक सर्कल चौकाकडे जाण्यास वाहनांना प्रवेश बंद असेल. येथील वाहतूक लक्ष्मी चौकाकडून जातील . जॉमेट्रिक सर्कल चौकाकडून मेझा व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक टाटा टी जंक्शन चौकाकडे जाऊन लक्ष्मी चौकमार्गे जातील. मेझा नाईन चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यास मनाई असून ही वाहने लक्ष्मी चौक मार्गे पुढे जातील. तसेच शिवाजी चौकाकडून वाकडनाका, हिंजवडी गावठाण कडे जाण्यास बंदी असेल. ही वाहने विप्रो सर्कल फेज एक, जॉमेट्रिक, टाटा टी जंक्शन चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौक हिंजवडीकडे वाहने जाण्यास बंदी असेल. ही वाहने विनोदे वस्ती कॉर्नर, लक्ष्मी चौक मार्गे जातील. शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे जाणारी वाहने इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौकने पुढे विनोदे वस्ती कॉर्नरमार्गे जातील. हा बदल ९ सप्टेंबरला सायंकाळी चार ते रात्री बारा पर्यंत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT