Pimpri Municipality free booster dose Vaccine at eight centers  sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी महापालिका मोफत बूस्टर डोस; आठ केंद्रांवर लस

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस (प्रिकॉशन डोस) महापालिकेतर्फे मोफत दिला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस (प्रिकॉशन डोस) महापालिकेतर्फे मोफत दिला जाणार आहे.

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस (प्रिकॉशन डोस) महापालिकेतर्फे मोफत दिला जाणार आहे. त्यासाठी आठ केंद्रांवर व्यवस्था केली असून कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड लशीचे प्रत्येकी चार हजार प्रमाणे आठ हजार आणि मुलांसाठीच्या कोर्बेव्हॅक्स लशीचे चार हजार असे १२ हजार डोस दररोज उपलब्ध असतील.

महापालिकेतर्फे १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सुरुवातीला कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड लस आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाइन वर्कर यांना लस देण्यात आली. टप्प्याटप्प्याने लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात आले. सध्या महापालिकेतर्फे कोर्बेव्हॅक्स, कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड लस दिली जात आहे. या तीनही लसींसह स्फूटनिक व्ही व कोव्हाव्हॅक्स लस खाजगी केंद्रांवर दिली जात आहे.

लसीकरण केंद्र

महापालिकेने कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, नवीन थेरगाव रुग्णालय, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, होळकर शाळा जुनी सांगवी, वायसीएम हॉस्पिटल संत तुकारामनगर पिंपरी (कुटुंब कल्याण विभाग, खोली क्रमांक ६२) या केंद्रांवर लसीकरण व्यवस्था केली आहे.

१२ हजार डोस

महापालिकेने आठ केंद्रांवर कोर्बेव्हॅक्स, कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड लशीचे प्रत्येकी पाचशे डोस उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक लशीचे पाचशे याप्रमाणे एका केंद्रावर दीड हजार डोस उपलब्ध आहेत. तिथे पहिला, दुसरा व दुसरा डोस घेऊन सरकारने निश्चित केलेला कालावधी पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

असे होईल लसीकरण

  • कोव्हिशिल्ड ः पहिला डोस घेऊन १२ ते १६ आठवडे अर्थात ८४ ते ११२ दिवस झालेल्यांना दुसरा डोस मिळेल

  • कोर्बेव्हॅक्स व कोव्हॅक्सिन ः पहिला डोस घेऊन २८ दिवस अर्थात चार आठवडे झालेल्यांना दुसरा डोस मिळेल

  • बुस्टर किंवा प्रिकॉशन डोस ः लशीचा दुसरा डोस घेऊन सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झालेल्यांना मिळेल

दृष्टिक्षेपात लसीकरण

  • लसीकरण वेळ सकाळी ९.३० ते दुपारी ४.३०

  • कोविन ॲपवर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करावे

  • गर्भवती, दिव्यांग, ज्येष्ठ, तृतीयपंथी यांना प्राधान्य

  • साप्ताहिक सुटीमुळे प्रत्येक रविवारी लसीकरण बंद

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लशींच्या साठ्यानुसार १२ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आठ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली असून, सरकारच्या सूचनांनुसार कोर्बेव्हॅक्स, कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड लशींचे पहिला व दुसरा आणि कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड लशींचे बूस्टर डोस दिले जात आहेत.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT