PCMC Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : विविध विषय समित्यांवर नव्यांना संधी मिळणार?

महापालिका विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीत नवीन सदस्यांची बुधवारच्या (ता. २०) सर्वसाधारण सभेत निवड केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीत नवीन सदस्यांची बुधवारच्या (ता. २०) सर्वसाधारण सभेत निवड केली जाणार आहे. महापालिकेच्या आगामी अर्थात फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीचा विचार करता अवघे अडीच ते तीन महिने सदस्यांना मिळणार आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व विद्यमान सदस्यांनाच कायम ठेवणार की आजपर्यंत कोणतेच पद न मिळालेल्यांना अथवा मर्जीतील नगरसेवकांना संधी देणार याचा उलगडा सभेतच होणार आहे.

विषय समित्यांच्या सदस्यांची मुदत एक वर्षांची असते. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये मुदत संपलेल्या समित्या बरखास्त झाल्या होत्या. कोरोनामुळे निवड लांबणीवर पडली होती. त्या सर्व समित्यांवर ऑक्टोबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी काही सदस्य व अध्यक्षांची भाजप नेतृत्वाने पुन्हा निवड केली होती. आता त्या सर्वांची मुदत संपली आहे. काही सदस्यांनी आपल्याला विषय समित्यांवर संधी मिळावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली आहे. त्या मागणीचा विचार होणार की, आहे त्याच सदस्यांना पुढील अडीच-तीन महिन्यांसाठी कायम ठेवणार याबाबत उत्सुकता आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी एक महिना अगोदर आचारसंहिता लागू शकते. याचा विचार केल्यास विषय समिती सदस्यांना कामकाज पाहण्यासाठी केवळ अडीच ते तीन महिने कालावधी मिळणार आहे.

४५ सदस्यांना संधी

महापालिकेच्या एका विषय समितीत नऊ सदस्य असतात. पाच विषय समित्या मिळून प्रत्येकी नऊ प्रमाणे ४५ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. पक्षीय बलाबलानुसार प्रत्येक समितीत भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची निवड होईल.

प्रत्येकी केवळ सहा सभा

स्थायी समितीची सभा साप्ताहिक आणि विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा- कला- साहित्य व सांस्कृतिक व शिक्षण या समित्यांच्या पाक्षिक सभा होतात. म्हणजेच महिन्यात केवळ दोन सभा. तीन महिन्यांचा विचार केल्यास प्रत्येक समितीच्या केवळ सहा सभा होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT