sakal
sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी: भाजप नगरसेविकेसह दहा जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: गणेशोत्सव सुरू होत असल्याने कासारवाडीतील खोदकाम करू नये, अशी विनंती भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी अधिकारी व ठेकेदाराला केली. मात्र, तरीही कामे सुरूच ठेवल्याने शेंडगे यांच्यासह काही महिलांनी गुरुवारी (ता. ९) दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी चिंचवड महापालिका भवनात आंदोलन केले. आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडून आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकली. कोरोना नियमांचे उल्लंघन करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेविकेसह दहा जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली.

नगरसेविका आशाताई तानाजी धायगुडे - शेंडगे, पूजा अरविंद भांडारी, शीतल पंकज पिसाळ, गौरी कमलाकर राजपाल, आशा जैस्वाल, शीतल महेश जाधव, जयश्री रामलिंग सनके, संध्या रमेश गवळी, स्वप्नील भारत आहेर, संजय शंकर पवार (सर्व रा. कासारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर संजय शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी प्रमोद रामकृष्ण निकम (रा. सदर्शननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. आंदोलकांनी कोरोना नियमांचे पालन करून लोकशाही मार्गाने आंदोलन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी आपापसात कट रचून अंगावर शाई फेकण्याच्या उद्देशाने शासकीय अधिकारी अशोक भालकर यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्या खुर्चीवर फुले व काळी शाई टाकली. तसेच त्यांच्या टेबलावर धिक्कार असो असे लिहिले.

तसेच आयुक्तांच्या दालनाबाहेर बेकायदा जमाव जमवून आयुक्तांना दालनाबाहेर पडण्यास अटकाव केला. सुरक्षारक्षक व पोलिसांना धक्काबुक्की केली. आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकून मोठमोठ्याने घोषणाबाजी केली. दरम्यान, याप्रकरणी कोरोना नियमांचे उल्लंघन करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT