पिंपरी-चिंचवड

कामशेतमध्ये लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

कामशेत (ता. मावळ) : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचे हत्यार प्रशासनाने उगारले. नाकातोंडाला नियमित मास्कचा वापर करावा. दुचाकी चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांसाठी निर्बंध घातले, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व शहराच्या बाहेरून जाणाऱ्या महामार्गावर या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. 

लॉकडाउन जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. शहरातील पोलिस प्रशासन नियम मोडणाऱ्या बहाद्दरांवर पकडून त्यांच्यावर न्यायालयीन व दंडात्मक कारवाईसाठी पाठवित आहे. तालुक्यातील बहुतेक नागरिक हे नियम मोडत आहे. याशिवाय तालुक्याच्या बाहेरून येणारे पर्यटकांकडूनही या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. 

ग्रामपंचायतीने मास्क न वापरणाऱ्या ५५ जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल केला आहे. तर पोलिसांनी आतापर्यंत ६३७ जणांवर कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलिस फौजदार दत्तात्रेय खंडागळे यांनी दिली. खंडागळे म्हणाले, की शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ही कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinaga News: गळतीमुळे लागला चाचणीला ब्रेक; तिसऱ्या दिवशी २७ मिनिटांत आले १६ किलोमीटरपर्यंत पाणी

Latest Marathi News Live Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; सोमवारपासून जोर वाढणार

Petrol Diesel Shortage India : पेट्रोल -डिझेल, गॅसचा तुटवडा आहे का नाही; खुद्द सरकारनेच स्थितीबाबत केल खुलासा

Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोलसाठी भर उन्हात वाहनधारकांना चटके!; रांगा लावूनही दीड ते दोन तास प्रतीक्षा करण्याची वेळ; बहुतांश पंप ड्राय, मोजकेच सुरू

“स्वतंत्र विचाराला कमी लेखणारी संस्कृती धोकादायक” – डॉ. मुग्धा कर्णिक

SCROLL FOR NEXT