Pune metro Sakal
पिंपरी-चिंचवड

Metro : माण-हिंजवडी-शिवाजीनगर नावे धावणार मेट्रो; ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडीत वसल्याचा किंबहुना आयटी पार्क हिंजवडी असे नाव सर्वत्र प्रसिद्ध.

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी - राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडीत वसल्याचा किंबहुना आयटी पार्क हिंजवडी असे नाव सर्वत्र प्रसिद्ध. मात्र, देशहितासाठी हजारो एकर जमीन देऊन भूमिहीन झालेल्या माण भूमिपुत्रांना उशिरा का होईना न्याय आणि बहुमान मिळाला आहे. बहुचर्चित हिंजवडी मेट्रो प्रकल्प आता नव्याने माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प झाल्याने या नावेच आता मेट्रो धावणार आहे. त्यामुळे माण ग्रामस्थांनी आनंद विशेष व्यक्त केला.

आयटीतील महत्त्वाच्या प्रकल्पांना ‘माण’ गावाचे नाव असावे यासाठी ग्रामस्थांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा केला होता. मेट्रो प्रकल्प जाहीर झाल्यानंतरही काही ग्रामस्थांनी त्यास विरोध करीत माणच्या नावाचा समावेश करून नामकरण करण्याची मागणी केली होती. वारंवार पत्रव्यवहार करत अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या.

त्यामुळे माण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या लढ्यास यश आले असून, आता माणमध्ये सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी पुणे मेट्रो ३ प्रकल्पाला ‘माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प’ असे नाव देण्यास केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे मान्यताप्राप्त राजपत्र नुकतेच प्रसारित करण्यात आले आहे. आयटीचे अनेक टप्पे माण गावात आहेत.

यासाठी हजारो एकर जमिनीवर शिक्के पडले आहेत. यापूर्वी देखील हजारो एकर जमिनींवर आयटी हब विस्तारले आहे. त्यामुळे हिंजवडीसोबतच माण गावाचे नाव एमआयडीसी व सर्व शासकीय यंत्रणेच्या अधिकार कक्षेत यावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून माण ग्रामपंचायत व ग्रामस्थ शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. अखेर या लढ्याला यश आले.

ग्रामपंचायत सदस्यांनी केलेला पाठपुरावा व ग्रामस्थांच्या एकजुटीची दखल सरकारने घेतली ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर अस्मितेची लढाई म्हणून आमच्या सर्व सदस्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने नामतरांचा हा प्रश्न मार्गी लागला. हे माणवासीयांच्या लढ्याचे यश आहे.’

- अर्चना आढाव, सरपंच माण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT