Crime Sakal
पिंपरी-चिंचवड

टायगर ग्रुपच्या रायगड जिल्हाध्यक्षाला चिंचवडमध्ये अटक

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने चिंचवड मध्ये अटक केली. हा आरोपी टायगर ग्रुपचा रायगड जिल्हाध्यक्ष आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - नवी मुंबईमधील कामोठे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या (Murderer Attack) गुन्ह्यातील फरारी आरोपीला (Accused) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने चिंचवड मध्ये अटक (Arrested) केली. हा आरोपी टायगर ग्रुपचा रायगड जिल्हाध्यक्ष आहे. (Raigad District President of Tiger Group Arrested in Chinchwad)

नीलेश रमेश चव्हाण (वय ३०, रा. साक्षी पार्क -२ मालेवाडी स्टॉप, सुकापुर ता. पनवेल, जि. रायगड) असे आरोपीचे नाव आहे. १५ नोव्हेंबर २०२० ला कामोठे येथील एका हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी नीलेश याच्यासह चार ते पाच जणांनी मिळून हॉटेल चालक व वेटर यांना मारहाण केली होती. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. यातील मुख्य सूत्रधार असलेला नीलेश हा फरारी होता. दरम्यान, तो सोमवारी (ता. २१) सायंकाळी चिंचवडमधील क्विन्स टाऊन सोसायटीसमोर येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT