पिंपरी-चिंचवड

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहर परिसरात सुमारे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तुरळक ते हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. तो अल्पकाळ टिकला. काही भागांत थोड्या काळासाठी वीजपुरवठा खंडित झाला. 

गेल्या आठवड्यामध्ये पावसाने पुनरागमन केले होते. त्यावेळेस पाऊस कायम राहील, असे वाटत असतानाच पावसाने दडी मारली होती. मात्र, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पावसाने परत हजेरी लावली. त्यात फारसा जोर नव्हता. परंतु, मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक मंदावली. पिंपरी चौक, मोरवाडी चौकासह ठिकठिकाणी ग्रेडसेपरेटर, भुयारी मार्गांचा दुचाकी चालकांनी आसरा घेतला. पाऊस ओसरताच दुचाकीचालक इच्छित स्थळी रवाना होताना दिसत होते. पाऊस अल्पकाळ टिकला.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, मोशी प्राधिकरण, चिखली आदी भागांत तुरळक ते हलक्‍या स्वरुपाचा पाऊस झाला. जुनी सांगवी, दापोडीत पावसाने पाठ फिरविली होती. पिंपळे सौदागर येथे भुरभूर राहिली. भोसरी, दिघी भागांत हलका पाऊस पडला. त्याने, रस्तेही पूर्ण ओले झाले नाहीत. मोशी प्राधिकरण येथे अवघा 5 मिनिटे तुरळक पाऊस झाला. पाऊस पडत असतानाच जोराचा वाराही सुटला. त्याने पाऊस गेला. चिखली भागांत अर्धा तास पावसाची रिमझिम चालू होती. तेथे गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. मात्र, शुक्रवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत राहिला. चिंचवड स्टेशन येथे थोड्या काळासाठी वीज गायब झाली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT