Ration Distribution  sakal
पिंपरी-चिंचवड

Ration Distribution : बाहेरच्यांना धान्‍य वाटप; स्‍थानिक मात्र वंचित

Ration Distribution : अपूर्ण कोटा शिधापत्रिकाधारक आणि दुकानदारांमध्ये वादावादी

सकाळ वृत्तसेवा

- प्रदीप लोखंडे

पिंपरी - रोजगारासाठी अन्य जिल्ह्यांमधून शहरात आलेल्‍या नागरिकांनाही येथील धान्‍य दुकानदारांकडे धान्‍य घेता येईल, असा नियम शासनाने सुरू केला आहे. दोन वर्षांपासून या नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, त्यासाठी आवश्‍यक असलेला वाढीव कोटा दुकानदारांना दिला नाही.

त्‍यामुळे दुकानदार नाराजी व्‍यक्‍त करत असून, बाहेरच्‍यांना धान्‍य दिल्‍यास स्‍थानिकांचे काय करायचे असा प्रश्‍न उपस्‍थित करत आहेत. तर मंजूर कोट्यापैकी सर्वच धान्‍याचे वाटप होत नाही. शिल्‍लक राहिलेल्‍या धान्‍यातून बाहेरच्‍यांना धान्‍य देता येण्याची सोय असल्‍याचे अधिकारी सांगत आहेत.

Ration Distribution

अन्नधान्य वितरण व पुरवठा कार्यालयाच्‍यावतीने धान्‍य दुकानदारांना दर महिन्‍याला धान्‍याचा कोटा निश्‍चित केला जातो. अन्‍नसुरक्षा आणि अंत्‍योदय योजनेच्‍या शिधापत्रिकाधारकांना गहू आणि तांदळाचे वाटप केले जाते. शासनाने ‘एक देश एक कार्ड’ या योजनेंतर्गत देशात कोठेही धान्‍य घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रोजगारासाठी इतर जिल्‍ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल होत आहेत. शहरात साडे तीन लाख शिधापत्रिका कार्यरत आहेत.

नवीन नियमांमुळे हे नागरिक शहरातील धान्‍य दुकानदारांकडे धान्‍य घेण्यासाठी गर्दी करत आहेत. दुकानदारांकडूनही त्‍याचे वाटप केले जात आहे. मात्र, शिधापत्रिकाधारकांची येणारी संख्या पाहता मिळणारा धान्‍याचा कोटा अपुरा असल्‍याच्या तक्रारी दुकानदार करत आहेत. त्‍यामुळे वाढीव धान्‍याचा कोटा देण्याची मागणी होत आहे.

तो न दिल्‍याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाहेरच्‍यांना धान्य दिल्‍यास स्‍थानिकांना धान्‍यापासून वंचित राहावे लागत आहे. त्‍यामुळे वाद होत असल्‍याचे दुकानदार सांगत आहेत. तर मंजूर धान्‍याचा कोट्याचे सर्वच वाटप होत नाही. शिल्‍लक राहिलेल्‍या धान्‍यातून बाहेरच्‍या लोकांना धान्‍य वाटप करण्याची मुभा असते, असे अधिकारी सांगत आहेत.

  1. दुकानदारांच्‍या अडचणी

  2. धान्‍याचा अपुरा पुरवठा

  3. कोटा संपल्‍यानंतर नागरिकांशी वाद

  4. धान्‍य दुकानदारांकडे हेलपाटे मारावे लागल्‍याने नाराजीचा सूर

‘एक देश एक शिधापत्रिका कार्ड’ असा नियम केल्‍याने बाहेरच्‍या गावातील अथवा शहरातील शिधापत्रिकाधारकदेखील धान्‍य घेण्यासाठी दुकानावर येतात. जेवढा कोटा आहे तेवढे वाटप झाल्‍यानंतर इतरांना धान्‍य देता येत नाही. अशा वेळी नागरिकांची नाराजी पसरत आहे. धान्‍याचा वाढीव कोटा देण्याची मागणी सातत्‍याने पत्रव्‍यवहाराद्वारे केली आहे. मात्र, सकारात्‍मक कार्यवाही झाली नाही.

- विक्रम छाजेड, धान्य दुकानदार, चिखली.

धान्‍य दुकानदारांना महिन्‍यासाठी धान्‍याचा कोटा निश्‍चित केला जातो. वाढीव धान्‍याचा कोटा देण्याची तरतूद सध्या तरी नाही. मंजूर कोट्यापैकी सर्वच धान्‍याचे वाटप होत नाही. शिल्‍लक राहिलेल्‍या धान्‍याचे बाहेरच्‍या शिधापत्रिकाधारकांना वाटप करता येते. त्‍यामुळे अडचणी येत नाहीत. स्‍थानिक शिधापत्रिकाधारकांना प्राधान्‍याने धान्‍य दिले जाते. त्‍यानंतर इतरांना धान्‍याचे वाटप केले जात आहे.

- स्‍नेहल गायकवाड, पुरवठा निरिक्षक, निगडी कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT