ड्रीम इलेव्हनमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाला नशीब उजळलं आहे. या क्रिकेटप्रेमी उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. सोमनाथ झेंडे असं त्यांचं नाव असून ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम लावली होती. दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याने त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ झेंडे यांचे क्रिकेटचे प्रचंड प्रेम आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांना ड्रीम इलेव्हन ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल ठरली. त्यात सोमनाथ झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. झेंडेंच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
अनेक जण ड्रीम 11मुळे आपलं सर्वकाही गमावतात अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. अशाताच पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाने तब्बल दीड कोटींचं बक्षीस जिंकलं आहे. उपनिरीक्षकाला मिळालेल्या या बक्षिसाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
विश्वचषक सुरु असल्याने अनेकजण ड्रीम 11वरती टीम तयार करुन पैसे लावतात. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाने देखील अशीच ड्रीम 11वर टीम लावली आणि दीड कोटी रुपये जिंकले आहेत.
सोमनाथ झेंडे हे पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर त्यांनी ड्रीम इलेव्हन टीम लावली होती अशी माहिती उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी दिली. सध्या सुरु असलेला विश्वचषक आपण नियमितपणे पाहत असून क्रिकेटची आवड असल्याचे सोमनाथ झेंडे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.