Illegal Hording
Illegal Hording Sakal
पिंपरी-चिंचवड

तीन दिवसांत अनधिकृत होर्डिंग काढा अन्यथा दंड वसूल करणार; प्रशासनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

खासगी जागेतील अनधिकृत होर्डींग काढण्याची मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यात संपूर्णत: अनाधिकृत २८ होर्डींग काढले आहेत.

पिंपरी - खासगी जागेतील (Private Place) अनधिकृत होर्डींग (Illegal Hording) काढण्याची मोहिम महापालिकेने (Municipal Campaign) हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यात संपूर्णत: अनाधिकृत २८ होर्डींग काढले आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडे अनधिकृत होर्डींग नियमितीकरणासाठी आलेल्या अर्जांची स्थळ पाहणी व छानणी करून सर्व अर्ज (Form) फेटाळण्यात आले आहेत. त्यांना होर्डींग (Hording) काढण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर महापालिका स्वतः होर्डींग काढून त्याचा खर्च संबंधित जागा मालकाकडून वसूल केला जाईल, असा इशारा महापालिका प्रशासक राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिला आहे.

महापालिकेचे नवीन बाह्य जाहिरात धोरण विचाराधीन आहे. त्यात शहर सौंदर्याचा विचार केला आहे. या धोरणाला अनुसरुन महापालिका जागेतील १३५ अनधिकृत होर्डींग यापूर्वीच काढले आहेत. होर्डींग नियमितीकरणासाठी आलेल्या अर्जांनुसार प्रत्यक्ष स्थळपाहणी केली. त्या वेळी अर्जात नमूद आकारमान आणि प्रत्यक्ष उभारलेल्या होर्डींगच्या आकारमानात विसंगती दिसून आली आहे. पुर्वीचे नवीन परवानगीसाठी ११७ अर्ज प्राप्त झाले आहेत. नियमित परवानगीसाठी २६८ अर्ज प्राप्त झाले होते. फलक उभा करून बराच कालावधी झाला आहे. त्यापासून जागामालकांना उत्पन्न मिळत आहे. मात्र, महापालिकेस कोणतेही शुल्क भरले जात नसल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे.

तसेच, होर्डींगधारक व जागा मालकांकडून संदर्भीय तरतुदींचा भंग झाला आहे. गेल्यावर्षी परवानगीसाठी आलेल्या अर्जांपैकी काही ठिकाणी विनापरवाना होर्डींग उभारल्याचेही दिसून आले आहे. असे होर्डींगही काढण्यात येणार आहेत. त्यांचे तीन वर्षांचे परवाना शुल्क हे दंड स्वरुपात वसूल केले जाईल. जागा मालकांनी आपल्या मालकीचा जाहिरात फलक महापालिकेचे पत्र मिळाल्यापासून तीन दिवसांत स्वत:हून काढून टाकावा. अन्यथा महाराष्ट्र महापालिका अधिनियम (जाहिरात व फलक नियंत्रण) नियमानुसार होर्डींग काढून त्याचा खर्च होर्डींगधारक व जागा मालक यांच्याकडून वसूल केला जाई.

दृष्टिक्षेपात होर्डिंग

  • परवानगी अर्ज : ११७

  • नूतनीकरण अर्ज : २६८

  • अनधिकृत होर्डिंग: ३०८

  • काढलेले होर्डिंग: १३५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT