traffic police  sakal
पिंपरी-चिंचवड

Chakan News : टार्गेट म्हणून अनेक वाहचालकांना पोलिसांकडून त्रास; कारवाईच्या बडग्याने नागरिक, कामगार त्रस्त

चाकण शहर व परिसरातील नागरिक पोलीस कारवाईच्या बडग्याने त्रस्त; काही अधिकारी, पोलीस कर्मचारी त्यांचे टार्गेट म्हणून त्रास देत आहेत का? असाही प्रश्न होतोय उपस्थित.

हरिदास कड

चाकण - चाकण शहर व परिसरात औद्योगिक वसाहतीत चाकण वाहतूक विभाग, महाळुंगे वाहतूक विभाग तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी- चिंचवड यांच्या वतीने बेशिस्त वाहन चालक तसेच वाहनावर नियम मोडल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाते.

या कारवाईत काही सर्व सामान्य नागरिक, कामगारही भरडले जातात आणि अगदी एका वेळेला संबंधित वाहनमालकाचे चार हजार रुपयाचे चालान फाडले जाते. त्यामुळे नागरिक, सर्व सामान्य माणूस संताप व्यक्त करत आहेत . काही वाहन चालकांच्या वाहनावर तर अगदी वीस-पंचवीस हजार रुपयांचे दंड आहेत.

यामुळे चाकण शहर व परिसरातील नागरिक या कारवाईच्या बडग्याने मात्र त्रस्त झालेले आहेत. काही अधिकारी, पोलीस कर्मचारी त्यांचे टार्गेट म्हणून त्रास देत आहेत का असाही प्रश्न नागरिक, वाहचालक, कामगार यांना निर्माण होतो आहे.

चाकण, ता. खेड येथील परिसरात तसेच औद्योगिक वसाहतीच्या परिसरात रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात आहे. वाहतूक कोंडीने नागरिक, कामगार त्रस्त झालेले आहेत त्यात चाकण वाहतूक विभाग, महाळुंगे वाहतूक विभागाच्या वतीने वाहनांचे मोबाईल वर फोटो काढून दंडात्मक कारवाई केली जाते. बेशिस्तपणे नियम मोडून वाहने चालवीणाऱ्या वाहनचालकावर तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी वाहन चालकावर कारवाई केली जाते.

वाहतूक विभागाच्या वतीने प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनांचे फोटो काढले जातात आणि त्या व्यक्तीला तात्काळ दंड केला जातो. चालान फाडले आहे त्याची रिसिप्ट वाहनमालकाच्या मोबाईलवर येते. या कारवाईमुळे नागरीक, सर्वसामान्य माणूस, कामगार त्रस्त झालेले आहेत. याबाबत

सुशील कोल्हे यांनी सांगितले की,' मी चाकण येथील रहिवाशी असून मी पर्यायी मार्गाने मार्गाने आंबेठाण चौकात चाललेलो होतो. माझ्या वाहनाचे फोटो एकाने काढले. मी वाहन व्यवस्थित चालवले असताना पर्यायी मार्गाने चालवत असताना मी त्याला याबाबत विचारणा केली तर त्या व्यक्तीने तुमचे फोटो डिलीट करतो. तुम्हाला दंड येणार नाही असे सांगितले.

रात्री आठच्या सुमारास माझ्या मोबाईलवर चार हजार रुपये दंड चालन फाडला आहे असा मेसेज आला. सामान्य माणसाला जर याचा फटका बसत असेल तर त्याने काय करायचे? त्यानंतर मी वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी, पोलिसांकडे चौकशी केली. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे गेलो.त्यानंतर ती दंडाची पावती प्रादेशिक परिवहन विभाग पिंपरी- चिंचवड यांनी केलेली आहे असे समजले.

प्रादेशिक परिवहन विभागाची ती व्यक्ती त्याला टार्गेट म्हणून अनेक वाहनांचे फोटो काढत होते. जी अवैध वाहने, रिक्षा धावतात त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही परंतु जे प्रामाणिकपणे वाहने चालवतात त्यांच्यावर कारवाई होते हा अन्याय आहे. 'याबाबत पिंपरी- चिंचवड चे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सांगितले की, 'मी पावती बघून घेतो. परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्याने कारवाई केलेली असेल तर ती नक्की का केली याबाबत माहिती घेतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT